श्राद्धात जेवण वाढण्याची पद्धत
‘पितरांसाठीच्या ताटात नेहमीपेक्षा उलट पद्धतीने अन्नपदार्थ वाढल्याने रज-तमात्मक लहरी उत्पन्न होऊन मृतात्म्याला अन्न ग्रहण करणे शक्य होते.’
‘पितरांसाठीच्या ताटात नेहमीपेक्षा उलट पद्धतीने अन्नपदार्थ वाढल्याने रज-तमात्मक लहरी उत्पन्न होऊन मृतात्म्याला अन्न ग्रहण करणे शक्य होते.’
श्राद्धविधीत पितर आणि देवतांना नैवेद्य दाखवणे ही महत्त्वाची कृती असल्याने त्यामागील शास्र जाणून घेणे आवश्यक ठरते. यादृष्टीने लेखात पितरांसाठीचे पिंड दर्भावर का ठेवतात, देवता आणि पितरांना नेवैद्य कसा दाखवावा इत्यादी सूत्रांमागील शास्र आपण पाहू.
‘ब्राह्मणाने जेवलेले अन्न पितरांना कसे पोहोचते ?’, ‘श्राद्धात दिलेले अन्न पितरांना किती काळ पुरते ?’ अशांसारख्या अभ्यासपूर्ण प्रश्नांची उत्तरे आणि यांमागील धर्मशास्र काय आहे, हे जाणून घेऊ.