पितृपक्ष
पितृपक्ष काळात श्राद्धविधी हा हिंदु धर्मातील एक महत्त्वाचा आचार असून त्याला वेदकाळाचा आधार आहे. व्यक्तीच्या मृत्यूनंतर आत्म्याला सद्गती मिळावी; म्हणून पितृपक्षात श्राद्ध करणे हे हिंदु धर्माचे एक वैशिष्ट्य आहे. प्रतिवर्षी भाद्रपद मासातील कृष्णपक्षात महालय श्राद्ध केले जाते. श्राद्ध म्हणजे काय आणि त्याविषयीचा इतिहास, श्राद्ध करण्याचे महत्त्व, पद्धत, तसेच श्राद्धपक्ष हा शुभकार्यासाठी निषिद्ध का मानला जातो, यामागील कारणे, तसेच श्राद्धविधी करण्यामागील उद्देश आपण जाणून घेऊया.
‘देवकार्यापेक्षा पितृकार्य श्रेष्ठ कसे’, श्राद्ध हे धर्म, अर्थ आणि काम यांची प्राप्ती कशी करून देते ?, श्राद्धामुळे पूर्वजांच्या त्रासांपासून आपले रक्षण कसे होते इत्यादी सूत्रांमागील अध्यात्मशास्त्रीय विवेचन या लेखात पाहू. या सर्व सूत्रांतून आपल्याला हिंदु धर्माचे महत्त्वही लक्षात येईल.
पितृपक्ष अन् श्राद्धाचे महत्त्व
श्राद्धाचे प्रकार
पितृदोषाची कारणे आणि उपाय
श्राद्धाच्या जेवणामागील अध्यात्मशास्त्र
श्राद्धात वापरण्यात येणार्या वस्तूंसंदर्भात
पितृपक्षात करण्यात येणाऱ्या श्राद्धविधीमागील शास्त्र
श्राद्ध करण्यात अडचणी आल्यास त्या दूर करण्याचे मार्ग
श्राद्धसंदर्भात शंकानिरसन
पितृपक्ष आणि श्राद्ध यांविषयी होणारा अपप्रचार आणि त्याचे खंडण
पितरांच्या शांतीसाठी विविध देशांमध्ये करण्यात येणार्या पारंपरिक कृती !
‘पितृपक्षात ‘श्राद्ध-पिंडदान’ हे पितृऋण फेडण्याचे एक माध्यम आहे. माता-पिता, तसेच निकटवर्तीय यांचा मृत्यूनंतरचा प्रवास हा सुखमय आणि क्लेशरहित व्हावा, त्यांना सद्गती मिळावी, यांसाठीचा संस्कार म्हणजेच ‘श्राद्ध.’ श्राद्धातील मंत्रोच्चारांमध्ये पितरांना गती देण्याची सूक्ष्म शक्ती सामावलेली असते. असे असले, तरी हिंदुविरोधक त्यावर ‘श्राद्ध म्हणजे ब्राह्मणांची पोटे भरण्यासाठीची सोय, तसेच मृत्यूनंतर पितरांसाठी दान-विधी करण्यापेक्षा गरिबांची सेवा करा, त्यांना अन्नदान करा’, असे म्हणून टीका करतात. पूर्वजांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संकल्पना केवळ भारतातच नाही, तर विदेशांतही पितरांच्या शांतीसाठी विविध पारंपरिक कृती करण्यात येतात. त्यांत पूर्वजांच्या मुक्तीसाठीची शास्त्रोक्त संकल्पना नसली, तरी किमान ‘पूर्वजांविषयी कृतज्ञ रहायला हवे’, एवढी भावना तर निश्चितच असते. तसेच विदेशात अन्य पंथांत जन्मलेले अनेक पाश्चिमात्य त्यांच्या पूर्वजांना मुक्ती मिळावी, या हेतूने भारतात येऊन पिंडदान आणि तर्पण विधी करतात.
अधिक माहिती वाचा…
हिंदु धर्मातील पितृपक्ष श्राद्धाचे महत्त्व दर्शवणारे वैशिष्ट्यपूर्ण संशोधन
पितृपक्षामध्ये पितरांना आवाहन केले जाते. त्यांचे पूजन करून त्यांना नैवेद्य अर्पण केला जातो. या काळात केलेल्या महालय श्राद्धाचा श्राद्ध करणार्यावर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यासाठी केलेली वैज्ञानिक चाचणी…
श्राद्ध पक्षात श्री गुरुदेव दत्त हा नामजप करावा !
१. श्री गुरुदेव दत्त तारक जप
२. श्री गुरुदेव दत्त मारक जप
३. ॐ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ ॐ तारक जप
४. ॐ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ ॐ मारक जप
हे विविध प्रकारचे ‘श्री गुरुदेव दत्ताचे’ नामजप कसे करावेत ?, हे ऐकण्यासाठी भेट द्या !
हिंदूंना धर्मशिक्षणाची आवश्यकता !
हिंदूंना धर्मशिक्षणाची आवश्यकता स्पष्ट करणारे शासनाचे ऑनलाईन श्राद्ध !
‘अलीकडेच एका हिंदी मासिकात बातमी होती की, शासनाने हिंदूंसाठी ‘ऑनलाईन’ श्राद्धाची सोय केली आहे. ती वाचून ‘हसू का रडू’, अशी माझी स्थिती झाली. शासनाला श्राद्ध प्रत्यक्ष करण्याची कृती आहे, हे समजत कसे नाही, याचे आश्चर्य वाटले. ‘ऑनलाईन’ जेवण, विवाह होत नाहीत, तर श्राद्ध कसे होईल ? कहर म्हणजे ही सोय करणारे म्हणे हिंदुत्ववाद्यांचे सरकार आहे ! हिंदूंना धर्मशिक्षणाची किती आवश्यकता आहे, हे यावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले. श्राद्धाचे निमित्त करून हिंदूंकडून कोट्यवधी रुपये जमवण्यासाठी तर हे हिंदुप्रेम जागृत झाले नाही ना, अशी शंकेची पालही मनात चुकचुकली.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१३.२.२०११)
धर्मप्रसाराच्या कार्यात सहभागी व्हा !
हे चित्र, आपल्या व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटर इत्यादी सोशल मीडियाच्या खात्यांवर वापरून, पितृपक्षानिमित्त धर्मप्रसाराच्या कार्यात सहभागी व्हा !
चित्र डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा !
व्हिडीओ (Video) पहा !
श्राद्ध विषयी विविध व्हिडिओ पाहण्यासाठी खालील व्हिडिओच्या playlist वर क्लिक करा !
श्राद्धाचा अर्थ आणि आवश्यकता | महालय श्राद्धविधीचे महत्त्व विषद करणारे वैज्ञानिक संशोधन |
पितृपक्षात महालय श्राद्ध करण्याचे महत्त्व | महालय श्राद्धविधीसंबंधीच्या शंकांचे निरसन |
पितृपक्षात महालय श्राद्धविधीची पूर्वतयारी | देव ब्राम्हणाने पूर्व दिशेकडे तोंड करुन भोजन करण्याचे सूक्ष्म-स्तरीय परिणाम |
श्राद्धकर्त्याची आणि विधीसंबंधीची पूर्वतयारी | पितर-ब्राम्हणांना अन्न निवेदन करताना – सुक्ष्मचित्र |
ब्राह्मणस्वागत आणि अन्नप्रोक्षण | पितर-ब्राम्हणाने उत्तर दिशेकडे तोंड करुन भोजन करणे – सुक्ष्मचित्र |
श्राद्धातील विश्वेदेव आणि पितर यांचे आवाहन आणि पूजन | पिंडपूजन – सुक्ष्मचित्र |
श्राद्धीय भोजनाची पूर्वसिद्धता | श्राद्धविधीमध्ये ब्राह्मणांच्या पानांभोवती पिशंगी म्हणजे भस्माचे मंडल काढण्याचे महत्त्व |
महालय श्राद्धविधीतील ब्राह्मणभोजन भाग – १ | श्राद्धकर्त्याने अष्टदिशांना काळे तीळ टाकण्याचे परिणाम |
महालय श्राद्धविधीतील ब्राह्मणभोजन भाग – २ | श्राद्धविधीमधे तिलोदकाचे महत्त्व |
महालय श्राद्धविधीतील ब्राह्मणभोजनाचे अध्यात्मशास्त्रीय कारण | पिंडपूजनासाठी दर्भ पसरून ठेवल्यावर घडणारी सूक्ष्मातील प्रक्रिया |
महालय श्राद्धविधीतील पिंडपूजन | श्राद्धविधीमधे काळ्या तिळाचा उपयोग करण्याचे कारण |
श्राद्धविधी करण्यासाठी आर्थिक अडचण असल्यास काय करावे ? | श्राद्धविधींमध्येे माका आणि तुळस वापरण्याचे कारण |
श्राद्ध संबंधित ग्रंथ खरेदीसाठी खालील ग्रंथांवर Click करा !
श्राद्धातील कृतींमागील अध्यात्मशास्त्रश्राद्धाचे महत्त्व आणि शास्त्रीय विवेचनदत्तदत्त (शास्त्रीय विवेचन आणि उपासना)