शेती करतांना करावयाच्या प्रार्थना
हे धरणीमाते, जलदेवते, वायूदेवते आणि आकाशदेवते ‘आपल्यामध्ये असलेले चैतन्य मला ग्रहण करता येऊ दे. माझ्यावर आपले अखंड उपाय होऊ देत. माझा सतत नामजप होऊ दे.’
हे धरणीमाते, जलदेवते, वायूदेवते आणि आकाशदेवते ‘आपल्यामध्ये असलेले चैतन्य मला ग्रहण करता येऊ दे. माझ्यावर आपले अखंड उपाय होऊ देत. माझा सतत नामजप होऊ दे.’
शंकराचार्यांनी परमेश्वराला केलेली प्रार्थना (ज्ञानयोगानुसार) – ‘हे परमेश्वरा, माझ्यातील उद्धटपणा दूर कर. माझ्या मनाचे दमन कर. माझी विषयमृगतृष्णा शांत कर. माझ्या ठिकाणी भूतदयेचा विस्तार कर आणि मला संसारसागरातून पैलतिरी ने.’
‘माणसाचा अहंकार आणि कर्तेपणाचा अभिमान हे त्याच्या आनंदाच्या आड येतात. तो अडथळा दूर करण्याचे सामर्थ्य माणसाच्या अंगी नाही; म्हणून ‘ईश्वराला शरण जाणे’ हा एकच अनुभवसिद्ध उपाय आहे. शरणागतीमध्ये जीव ईश्वरचरणी लीन होतो.
टाईम, सीएन्एन् आणि यूस्एवीकएन्ड यांनी केलेल्या पाहणीप्रमाणे ८० टक्के अमेरिकन जनताही श्रद्धावादी आणि प्रार्थनेवर विश्वास ठेवणारी आहे. प्रार्थनेमुळे होणारे शारिरीक आणि मानसिक स्तरावरील लाभ, तसेच रूग्णासाठी इतरांनी केलेल्या प्रार्थनेचे परिणाम जाणून घेऊया.
हिंदु धर्मशास्त्रात सहस्रो वर्षांपूर्वीच सांगितलेले प्रार्थनेचे महत्त्व परकियांना अलीकडे उमगणे !
साधना करतांना ईश्वराच्या अनुसंधानात रहाणे महत्त्वाचे असते. थोड्या थोड्या कालावधीनंतर प्रार्थना केल्यामुळे ईश्वराशी अनुसंधान साधणे सोपे जाते. प्रार्थनेमुळे व्यक्तीला व्यावहारिक आणि आध्यात्मिक लाभ होतात.
‘देव किंवा गुरु यांना शरण जाऊन इच्छित गोष्ट प्रकर्षाने याचना करून मागणे, म्हणजे प्रार्थना.
प्रार्थनेने देवता वा गुरु यांचा आशीर्वाद लाभतो, चिंता न्यून होऊन श्रद्धा वाढते आणि अशक्य गोष्टही शक्य होते.