एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत नैसर्गिकपणे शारीरिक क्षमता न्यून असल्याने थोडाच व्यायाम करा !

ग्रीष्म, वर्षा आणि शरद हे ३ ऋतू म्हणजे साधारणपणे २१ एप्रिल ते २० ऑक्टोबर या ६ मासांच्या कालावधीत तुलनेने सूर्य पृथ्वीच्या जवळ असल्याने नैसर्गिकपणे शारीरिक बळ न्यून असते

गुढीपाडव्याच्या दिवशी सत्य संकल्प करून तो प्रत्यक्षात यावा; म्हणून कृतीशील भक्तीसाठी मूर्तस्वरूप अशा गुढीची मुहूर्तमेढ आनंदाने करा !

आमचे प्रत्येक पाऊल हे आजपासून प्रगतीपथावर, जीवनसमृद्धीसाठी पडावे; म्हणून आजच्या दिवशी आमच्या जीवनाला फलदायी होईल, असा शुभ संकल्प करावयाचा.

श्राद्धाचा प्राचीन ग्रंथांमधील संदर्भ

‘मृत तिथीच्या श्राद्धाव्यतिरिक्त कितीही मौल्यवान पदार्थ असले, तरी पितर ते ग्रहण करू शकत नाहीत. विना मंत्राने दिलेले अन्नोदक पितरांना मिळत नाही.’ (स्कंद पुराण, माहेश्‍वरी खंड, कुमारिका खंड, अध्याय ३५/३६)

फराळाचे पदार्थ ठेवण्यासाठी वर्तमानपत्रे वापरणे आरोग्यासाठी धोकादायक

दिवाळीला करण्यात येणार्‍या फराळाचे पदार्थ ठेवण्यासाठी, त्यातील तेल टिपण्यासाठी वर्तमानपत्रे वापरतात; मात्र त्यामुळे गंभीर आजाराचा धोका अधिक आहे.

ईश्‍वरप्राप्तीचा राजमार्ग – शरणागती ! – के.वि. बेलसरे

‘माणसाचा अहंकार आणि कर्तेपणाचा अभिमान हे त्याच्या आनंदाच्या आड येतात. तो अडथळा दूर करण्याचे सामर्थ्य माणसाच्या अंगी नाही; म्हणून ‘ईश्‍वराला शरण जाणे’ हा एकच अनुभवसिद्ध उपाय आहे. शरणागतीमध्ये जीव ईश्‍वरचरणी लीन होतो.

सतीसावित्रीचा उपहास आणि मद्यपानाचेे महिलांवर होणारे दुष्परिणाम !

पुरुष अथवा स्त्रिया यांनी मद्यपान करणे, हे पुरोगामित्वाचे लक्षण आहे, असे म्हणता येणार नाही. भारताच्या ग्रामीण भागात पुरुषांची मद्यपान विरोधातील मोहीम ही अनेक वेळा स्त्रियांकडून राबवली जाते.

चहा पिणे आरोग्याला हानीकारक !

कर्करोग आणि हृदयरोग रोखणारे अ‍ॅन्टी-ऑक्सिडन्ट नामक पदार्थ केवळ को-या चहात आहे. दूध साखर घालून उकळलेला चहा आयुर्वेद शास्त्रानुसार अग्नीमांद्य घडवणारा (भूक अल्प करण्यास कारणीभूत असणारा) असतो.

घरातील लादीवर डाग पडल्यास लादीची स्वच्छता कशी कराल ?

‘लादीवर तेलकट पदार्थ पडला असेल, तर तो सर्वप्रथम कोरड्या कापडाने टिपून घ्या, म्हणजे लादीवर पडलेले तेल किंवा तूप अन्यत्र पसरणार नाही. त्यानंतर छोट्याशा भांड्यात थोडेसे पाणी घेऊन त्यात ‘डिटर्जण्ट पावडर’ टाका. हे पाणी उकळवा. त्यानंतर त्यात कापड भिजवून त्याने लादी पुसा.

जंक फूड त्यागून आयुर्वेद अंगीकारा !

जंक फूड खाल्ल्याने बुद्धीदौर्बल्य येते, शरिरात अनावश्यक वात आणि चरबी साठून शिथिलता येते. आज जंक फूड खाण्यात तरुण पिढी अग्रेसर आहेच; परंतु शाळकरी मुलेही त्यांच्या आहारी गेल्याचे निदर्शनास येते.