वटपौर्णिमेचे आध्यात्मिक महत्त्व स्पष्ट करणारे वैशिष्ट्यपूर्ण संशोधन !

‘वटपौर्णिमेला वडाच्या झाडाचे पूजन केल्याने सुवासिनीवर आध्यात्मिकदृष्ट्या काय परिणाम होतो?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली.

स्त्रियांनो, पतीव्रता सावित्रीच्या कथेतून बोध घ्या आणि तिच्यासारखी साधना अन् धर्माचरण करून खर्‍या अर्थाने वटपौर्णिमा साजरी करा !

ज्येष्ठ मासात येणारी पौर्णिमा हा दिवस ‘वटपौर्णिमा’ म्हणून साजरा केला जातो. ‘पती-पत्नीतील स्नेहसंबंध दृढ करून जिवांना आत्मज्ञान प्राप्त करून देणे’, हाच वटपौर्णिमा व्रताचा उद्देश आहे. सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्यासाठी ब्रह्मदेवाची तीन दिवस उपासना केली अन् त्यानंतर यमदेवालाही भक्तीने संतुष्ट करून पतीचे प्राण परत मिळवले.

वटपौर्णिमा

पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सात जन्म त्याच्या प्राप्तीसाठी हिंदू स्त्रिया वटपौर्णिमेचे व्रत करतात. वटवृक्ष आणि वटपौर्णिमा यांचे महत्त्व खालील लेखातून समजून घेऊया.