प्राचीन काळापासून विविध योगमार्गांनुसार साधना करणार्‍या ऋषिमुनींचे आध्यात्मिक महत्त्व !

‘ऋषि किंवा मुनि म्हटले, की आपले हात आपोआप जोडले जातात आणि आपले मस्तक आदराने झुकते. या भरतखंडात अनेक ऋषींनी विविध योगमार्गांनुसार साधना करून भारताला तपोभूमी बनवले आहे.

ऋषिपंचमी

ऋषिपंचमी हे व्रत भाद्रपद शुद्ध पंचमी या तिथीला साजरे करतात. या दिवशी पाटावर तांदुळाच्या आठ पुंज्या घालून त्यांवर आठ सुपार्‍या ठेवून कश्यपादी सात ऋषि व अरुंधती यांचे आवाहन व षोडशोपचार पूजन करावे.