#Gudhipadva : हिंदूंच्या अद्वितीय कालमापन पद्धतीचे अलौकिकत्व सांगणारा गुढीपाडवा !

जसा हिंदूंचा कुठलाही सण हा मौजमजेचा विषय नाही, तर मांगल्य, पावित्र्य, चैतन्य यांचा आनंदसोहळा आहे, तसाच गुढीपाडवाही आहे !

सामाजिक माध्यमांद्वारे श्री गणेशाच्या नावाचे पारपत्र प्रसारित करून श्री गणेशाचा अवमान !

‘भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाचे आगमन होणार’, या संकल्पनेवर श्री गणेशाचे चित्र असलेले पारपत्र (पासपोर्ट) सामाजिक माध्यमांवर प्रसारित करून श्री गणेशाचा अवमान करण्यात आल्याचे समोर आले आहे. या पारपत्रावर भाग्यनगर (हैद्राबाद) पारपत्र कार्यालयाचा शिक्का असून पारपत्र प्रदान अधिकारी म्हणून पी. कृष्णा चार्या यांचे नाव आणि स्वाक्षरी आहे. हे पारपत्र विनोद म्हणून सामाजिक माध्यमांवर प्रसारित करण्यात आले आहे.

गुरुपौर्णिमेनिमित्त संत संदेश !

महर्षि व्यासांनी ४ वेद, ६ शास्त्रे आणि १८ पुराणे यांमध्ये ज्या विराट आदिपुरुषाचे वर्णन केले आहे, तोच श्रीमन्नारायण आता ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले’ हे नाव धारण करून पृथ्वीतलावर अवतरित झाला आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आर्य सनातन वैदिक हिंदु धर्माच्या पुनर्स्थापनेचे कार्य आरंभ केले आहे. या कार्यासाठी त्यांनी सनातन संस्थेची स्थापना करून आम्हा साधकांची निवड केली.

पांडुरंग आणि एकादशी यांचे माहात्म्य !

आषाढ आणि कार्तिक मासांतील शुक्लपक्षात येणार्‍या एकादशींच्या वेळी श्रीविष्णूचे तत्त्व पृथ्वीवर अधिक प्रमाणात येत असल्याने श्रीविष्णूशी संबंधित या दोन एकादशींचे महत्त्व अधिक आहे.

देवळांतील यात्रा, जत्रोत्सव भावपूर्ण साजरे करून चैतन्य जोपासा !

देवतांच्या उत्सवाच्या दिवशी वातावरणात अधिक प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होत असते. या चैतन्याचा लाभ उठवण्यासाठी या जत्रा किंवा उत्सव अत्यंत भावपूर्ण पद्धतीने पार पाडले पाहिजेत.

जीवनाचे गुह्य ज्ञान शिकवणारी गुढी !

जीवनात काय साध्य करायचे आहे, याचे गुढी हे प्रतीक आहे. गुढी हे त्यागमय जीवन जगण्याचे प्रतीक आहे. जीवनाचा आदर्श असलेली गुढी आपल्याला आपल्या जीवनाचे गुह्य ज्ञान दाखवते.

रशियात होलिका दहनासारखा साजरा केला जाणारा मास्लेनित्सा फेस्टिव्हल

रशियात १०२ वर्षे जुना मास्लेनित्सा फेस्टिव्हल साजरा करण्यात आला. या फेस्टिव्हलमध्ये लोकांनी ७८ फूट उंच लाकडी घराला जाळले आणि मिठाईचे वाटप करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या. या पारंपरिक सणाला वसंतऋतूचे आगमन, कुटुंबाशी जवळीक आणि असत्याच्या विजयाच्या प्रतिकाच्या स्वरूपात साजरे करण्यात येते. भारतातील होलिका दहनासारखेच रशियातील या सणाचे स्वरूप आहे.

वैकुंठचतुर्दशी

‘विष्णुभक्ती करण्यासाठी आपल्या सर्वांना मिळालेली अमूल्य संधी म्हणजे ‘वैकुंठचतुर्दशी !’ वैकुंठचतुर्दशी या दिवसाचे महत्त्व असे आहे की, या दिवशी सर्व भक्तांसाठी वैकुंठाचे द्वार खुले असते.

कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या आपत्कालीन स्थितीत दिवाळी कशी साजरी करावी ?

कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर लागू करण्यात आलेली दळणवळण बंदी उठवली जात असून जनजीवन पूर्ववत् होत असले, तरी काही ठिकाणी सार्वजनिक निर्बंधांमुळे नेहमीप्रमाणे दिवाळी साजरी करण्यास मर्यादा आहे. अशा ठिकाणी दिवाळी साजरी कशी करावी, याविषयीची काही उपयुक्त सूत्रे येथे देत आहोत.