हिंदूंनो, धर्मशिक्षणाचा अभाव किंवा धर्मद्रोह यांमुळे होणार्‍या अपप्रचाराला बळी पडू नका !

एकमेकांना आपट्याचे पान दिल्यामुळे दोन्ही व्यक्तींतील त्याग आणि प्रीती यांत वाढ होते. दसरा हा विजयाचा दिवस असल्यामुळे या दिवशी आपट्याचे मौल्यवान पान एकमेकांना देऊन आनंदोत्सव साजरा करण्यात येतो.

वटपौर्णिमा

पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सात जन्म त्याच्या प्राप्तीसाठी हिंदू स्त्रिया वटपौर्णिमेचे व्रत करतात. वटवृक्ष आणि वटपौर्णिमा यांचे महत्त्व खालील लेखातून समजून घेऊया.

देवतांच्या युद्धातील गुढी !

गुढी ही विजयदर्शक असते. भगवंतांच्या षड्गुणांपैकी यश या गुणामुळे देवासुर युद्धात देवतांचा आधीच आणि प्रत्येक स्तरावर विजय झालेला आहे, हे दर्शवण्यासाठी युद्धाच्या प्रत्येक स्तरावर गुढी उभी केली जाते.

गुढीपाडव्याच्या दिवशी करावयाच्या धार्मिक कृती

प्रथम नित्यकर्म देवपूजा करतात. ‘वर्षप्रतिपदेला महाशांती करायची असते. शांतीच्या प्रारंभी ब्रह्मदेवाची पूजा करतात; कारण या दिवशी ब्रह्मदेवाने विश्‍वाची निर्मिती केली. पूजेत त्याला दवणा वाहतात. नंतर होमहवन आणि ब्राह्मणसंतर्पण करतात. मग अनंत रूपांनी अवतीर्ण होणार्‍या विष्णूची पूजा करतात.