#Ayurved # आयुर्वेद : …आहार कधी आणि कसा घ्यावा ?

काही वेळा अन्न शरिरातील दोषांनी दूषित होऊन अग्नीच्या मार्गातून थोडेसे बाजूला जाऊन थांबते. अशा वेळी आधीचा आहार पचलेला नसतांनासुद्धा भूक लागते. ही भूक खोटी असते. हिला खरी भूक समजून खाणाऱ्या माणसाला अवेळी घेतलेला आहार विषाप्रमाणे मारक ठरतो.

चतुर्विध आहार (आयुर्वेदाचा पाकमंत्र) !

जेवणापूर्वी कुठलाही द्रवपदार्थ अधिक प्रमाणात पिऊ नये. त्यामुळे भूक मंदावते. जेवणानंतरही मोठ्या प्रमाणात द्रवपान करू नये. तसे केल्यास अन्नपचन व्यवस्थित होत नाही; म्हणून जेवतांनाच आहारात द्रवपदार्थांचा समावेश करावा.

निरोगी शरिरासाठी परिहाराविरुद्ध आहार घेणे टाळा !

आयुर्वेदीय आहारमंत्र’ या माझ्या पुस्तकात भोजनविधीची सविस्तर माहिती दिली आहे. भूक लागल्यावर हात स्वच्छ धुऊन उष्ण, ताजे, स्निग्ध पदार्थ एकाग्रचित्ताने आणि पोटात थोडी जागा ठेवून जेवावे, असे काही नियम आहेत. ते धाब्यावर बसवून घेतलेला आहार म्हणजे ‘विधीविरुद्ध आहार’ होय.

‘प्रेशर-कुकर’ आणि ‘मायक्रोवेव्ह ओव्हन’सारख्या यंत्रांद्वारे अल्प वेळेत अन्न शिजवण्याच्या पद्धतींचे आहारावर दुष्परिणाम !

‘प्रेशर-कुकर’ आणि ‘मायक्रोवेव्ह ओव्हन’ या यंत्रांत निर्माण झालेली पोकळी रज-तमात्मक लहरींचे भोवरे आतल्याआत निर्माण करत रहाते. हे भोवरे अन्नघटकांमध्ये फेकले जात असतात.

देवतेला अन्नाचा नैवेद्य दाखवण्यामागील शास्त्र

नैवेद्य दाखवतांना सात्त्विक अन्नाचा नैवेद्य भावपूर्णपणे प्रार्थना करून देवतेला अर्पण केल्यास त्या नैवेद्यातील पदार्थांच्या सात्त्विकतेमुळे देवतेकडून प्रक्षेपित होणा-या चैतन्य-लहरी नैवेद्यात आकृष्ट होतात. देवतेला नैवेद्य दाखवल्यामुळे त्यात आकृष्ट झालेल्या चैतन्याने त्या नैवेद्याच्या आजूबाजूचे वायूमंडल शुद्ध होते.

अन्न आणि रोग यांचा संबंध, तसेच पचनशक्तीसंदर्भात महत्त्वपूर्ण विवेचन

लहान मुले आणि माता यांचा संतुलित आहार अन् पोषण यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याच्या अनुषंगाने मोदी शासनाने सप्टेंबर २०१९ हा मास ‘राष्ट्रीय पोषण मास’ (National Nutrition Month) म्हणून घोषित केला आहे.

कुपोषण (Malnutrition) : लक्षणे, प्रकार आणि उपचार

या माध्यमातून केवळ मुले आणि त्यांच्या माता, यांनाच नव्हे, तर सर्व भारतियांनाच आहाराविषयी वैशिष्ट्यपूर्ण माहिती अन् योग्य दृष्टीकोन मिळू शकेल.

उपवास

‘निरनिराळे उपवास हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. या उपवासांना साधुसंतांचे, ऋषी-मुनींचे आशीर्वाद असल्याने उपासकांना दैवी तेज प्राप्त होते.

फराळाचे पदार्थ ठेवण्यासाठी वर्तमानपत्रे वापरणे आरोग्यासाठी धोकादायक

दिवाळीला करण्यात येणार्‍या फराळाचे पदार्थ ठेवण्यासाठी, त्यातील तेल टिपण्यासाठी वर्तमानपत्रे वापरतात; मात्र त्यामुळे गंभीर आजाराचा धोका अधिक आहे.