सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा गुढीपाडव्यानिमित्त संदेश
सध्या कधी नव्हे, एवढा सनातन धर्माच्या जागृतीच्या संदर्भात अनुकूल काळ आहे. याचे एक उदाहरण; म्हणजे या वर्षी १४४ वर्षांनी आलेल्या प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील महाकुंभमेळ्यात ६६ कोटी हिंदूंनी गंगास्नान करणे. याचा अर्थ सनातन धर्माचा अभिमान बाळगणार्या भारतातील अनुमाने ५० टक्के हिंदूंनी गंगास्नान केले. हा सनातनी हिंदूंमधील जागृतीचा परमोच्च काळ आहे.