सत्संग २३ : अ-३ स्वयंसूचना पद्धत

गेल्या आठवड्यात आपण अ-१ आणि अ-२ या स्वयंसूचना पद्धतींचा तूलनात्मक अभ्यास केला. आजच्या सत्संगामध्ये आपण न्यूनंगड, भीती यांवर मात करण्यासाठी अ-३ पद्धतीने स्वयंसूचना कशा द्यायच्या ?, याविषयी जाणून घेणार आहोत. त्याआधी आपण साधनेचा प्रायोगिक अभ्यास घेऊया.

सत्संग २२ : अ-१ आणि अ-२ स्वयंसूचना पद्धतींचा तुलनात्मक अभ्यास

आपल्याकडून होणार्‍या अयोग्य कृती, मनातील अयोग्य विचार किंवा भावना यांच्या संदर्भात अ-१ पद्धतीने स्वयंसूचना देतात, तर कमी कालावधीसाठी म्हणजे १ – २ मिनिटांसाठी मनात उमटणार्‍या प्रतिक्रियांसाठी अ-२ पद्धतीने स्वयंसूचना देतात.

सत्संग २१ : अ-२ स्वयंसूचना पद्धत

अ-२ स्वयंसूचना पद्धत म्हणजेच अयोग्य प्रतिक्रियेऐवजी योग्य प्रतिक्रिया येण्यासाठीची पद्धत. प्रतिक्रिया म्हणजे प्रतिसाद ! अयोग्य प्रतिक्रिया म्हणजे अयोग्य प्रतिसाद ! अ-१ स्वयंसूचना पद्धतीप्रमाणेच अ-२ पद्धतीने स्वयंसूचना देण्याचे सूत्र आहे. – प्रसंग + योग्य दृष्टीकोन + योग्य प्रतिक्रिया (विचार किंवा कृती)

सत्संग २० : स्वयंसूचना सत्र

स्वयंसूचना सत्र म्हणजे काय, तर आपल्याकडून होणार्‍या चुका, अयोग्य कृती टाळून त्याजागी योग्य कृती काय करायच्या, याची मनाला दिशा देणे ! मनात नकारात्मक किंवा निराशेचे विचार येत असतील, तर त्याऐवजी मनाला सकारात्मक आणि आध्यात्मिक स्तरावर विचार करण्याची सवय लावणे !

सत्संग १९ : अयोग्य विचार आणि भावना यांवर अ-१ पद्धतीने स्वयंसूचना कशा बनवाव्यात ?

अ-१ स्वयंसूचना पद्धतीचे सूत्र आहे, ‘अयोग्य कृती / विचार / भावना + योग्य दृष्टीकोन किंवा परिणाम यांची जाणीव + योग्य कृती !’ याप्रमाणे आपण स्वयंसूचना बनवण्याचा प्रयत्न केला, तर आपल्याला आपल्या मनात येणारे अयोग्य विचार, तसेच भावना यांना योग्य दिशा देता येऊ शकते.

सत्संग १८ : अ-१ स्वयंसूचना पद्धत

अ-१ स्वयंसूचना पद्धतीचे साधारण ३ टप्पे आहेत. ते म्हणजे अयोग्य कृती, त्यानंतर योग्य दृष्टीकोन किंवा त्या चुकीमुळे होणारा परिणाम आणि तिसरा टप्पा म्हणजे योग्य कृती !

सत्संग १७ : आध्यात्मिक उपाय (मीठ-पाणी)

आजच्या सत्संगात आपण त्यांपैकी एक असलेल्या मीठ-पाण्याच्या उपायांविषयी जाणून घेणार आहोत. अनिष्ट शक्तींवर मात करण्यासाठी मीठ पाण्याचे उपाय अत्यंत सोपे आणि प्रभावी आहेत. नियमितपणे मीठ पाण्याचे उपाय केल्यास शरीरातील अनिष्ट शक्ती नष्ट करणे शक्य होते.

सत्संग १६ : आध्यात्मिक त्रास आणि उपाय (सात्त्विक कापूर आणि अत्तर)

आध्यात्मिक त्रास दूर करण्यासाठी आध्यात्मिक उपाय करणे आवश्यक असते. आध्यात्मिक उपायांमुळे आपले शरीर, मन, तसेच बुद्धी यांवर आलेले नकारात्मक आणि अनिष्ट आवरण दूर होते. आध्यात्मिक उपायांमुळे आपल्याभोवती संरक्षककवच निर्माण होते. आजच्या सत्संगात आपण सात्त्विक कापूर आणि अत्तर उपायांविषयी जाणून घेऊया.

सत्संग १५ : आध्यात्मिक त्रास आणि उपाय (प्रार्थना)

स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेच्या अंतर्गत स्वयंसूचना बनवणे, हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. या लेखात आपण स्वयंसूचना बनवतांना ती प्रभावी होण्यासाठी आणि मनाकडून लवकर स्वीकारली जाण्यासाठी काय सूत्रे लक्षात घ्यायला हवीत, याविषयी जाणून घेऊया.