हिंदु धर्मात मांसभक्षण करण्याला मान्यता दिली आहे, असे मानणे अयोग्य !

देवतेला नैवेद्य दाखवलेल्या सर्व वस्तू जर माणूस खाणार असेल, तर ती देवता असुरांचे रक्त पिते, गळ्यामध्ये कवट्यांची माळ घालते. या गोष्टीही सामान्य व्यक्ती करू शकेल का ? देवीप्रमाणे कृती करण्यासाठी आपल्यात देवत्व आणावे लागेल. त्यासाठी व्यक्तीने साधना करणे आवश्यक आहे.

मुलाला संन्यासापासून दूर राखण्याकरता शास्त्राचा आधार घेणार्या वडिलांना आद्य शंकराचार्यांनी दिलेले उत्तर

(आद्य) शंकराचार्यांनी एका ३० वर्षांच्या युवकास संन्यासाची दीक्षा दिली. त्याचे वडील ७५ वर्षांचे होते. त्यांना ही गोष्ट रुचली नाही. ते त्यांच्याकडे आले आणि तक्रार करू लागले. त्यावर शंकराचार्यांनी दिलेले उत्तर पुढे देत आहोत.

सनातन संस्थेचा नव्हे, तर हिंदु धर्माचाच द्वेष करणारे अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र !

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या २००० या वर्षीच्या वार्षिक विशेषांकात मठ्ठ, बुरसटलेली मानसिकता जपणारी सनातन संस्था ! या शीर्षकाखाली लेख प्रसिद्ध झाला होता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सनातन संस्थेविषयीचे आक्षेप आजही तेच आहेत; म्हणून आमच्या वाचकांसाठी त्यातील उतारे वैचारिक प्रतिवादासह प्रसिद्ध करत आहोत.

महिला आणि बालविकास मंत्री सौ. पंकजा मुंडे-पालवे यांचे भगवान शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेशबंदी हा स्त्रियांचा अपमान नव्हे !, हे प्रतिपादन योग्य कि अयोग्य ?

महाराष्ट्राच्या महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे-पालवे यांनी मंत्रालयातील पत्रकार परिषदेत काही विधाने केली. या विधानांच्या संदर्भात एबीपी माझा, साम इत्यादी वृत्तवाहिन्यांवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. या संदर्भातील सनातनचा दृष्टीकोन पुढे दिला आहे.

कर्नाटक येथील श्री सुब्रह्मण्यम् मंदिरात ब्राह्मणांच्या उष्ट्या पत्रावळींवर लोळण घेण्याची प्रथा धर्मसंमत आहे का ?

मंगळुरू येथील कुक्के श्री सुब्रह्मण्यम् मंदिरात प्रतिवर्षी कार्तिक कृ. षष्ठीला उत्सव असतो. या दिवशी देवतापूजनानंतर प्रथम ब्राह्मणभोजन केले जाते. या वेळी ब्राह्मणांनी भोजन केलेल्या केळीच्या उष्ट्या पत्रावळींवर भाविक लोळण घेण्याची प्रथा आहे.

शनिशिंगणापूरच्या शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेशबंदी का ?

शनिशिंगणापूर येथील शनिदेवाची स्वयंभू मूर्ती चौथर्‍यावर उभी आहे. मंदिर व्यवस्थापनाने काही वर्षांपूर्वीच चौथर्‍यावर चढून शनिदेवाला तेलार्पण करण्यास बंदी घातली होती. त्यामुळे सध्या तेथे सर्वच जाती-धर्माचे स्त्री-पुरुष श्री शनिदेवाचे दूरवरून दर्शन घेतात…

शबरीमला देवस्थानामध्ये महिलांना प्रवेशबंदी योग्य कि अयोग्य ?

शबरीमला देवस्थानात स्त्रियांना प्रवेशबंदी असण्यामागील कारण : भगवान अयप्पा हे भगवान शिव आणि श्रीविष्णुचा मोहिनी अवतार यांच्या तत्त्वापासून निर्माण झालेले आहेत. ते आजीवन ब्रह्मचारी होते, यासाठी …

टीका : सर्व हिंदू शाकाहारी असतात.

अमेरिकेतील प्रख्यात प्रसारमाध्यम ‘सीएन्एन्’च्या संकेतस्थळावर हिंदु धर्मातील सिद्धान्त मिथक (कल्पित) असल्याच्या स्वरूपात दिले आहेत. हे सिद्धान्त मिथक नसून त्यामागे अध्यात्मशास्त्र आहे.

नीतीनियमांत सुवर्णमध्य साधणार्‍या हिंदु धर्मातील आचारधर्मांचे श्रेष्ठत्व समजून घ्या !

काही तथाकथित सुधारणावादी तोकड्या कपड्यांमुळे महिलांवर अत्याचार होतात हे योग्य आहे का ?, घुंगट पद्धत योग्य आहे का ?, असे प्रश्‍न विचारून हिंदुत्ववाद्यांना मागासलेले ठरवण्याचा प्रयत्न करत असतात. अशा वेळी खालील सूत्रांच्या आधारे या सुधारणावाद्यांचा प्रतिवाद करावा.

वटपौर्णिमा या व्रताविषयी अयोग्य विचार, अपसमज आणि त्यांचे खंडण

सौभाग्यप्राप्तीसाठी करावयाच्या वटसावित्रीच्या पूजेविषयी ज्ञानप्रबोधिनी संस्कारमालेचे टीकात्मक भाष्य आणि प.पू. पांडे महाराजांनी त्याचे केलेले खंडण !