सोळा संस्कार
गर्भधारणा ते विवाहापर्यंतच्या (पाठभेद : मृत्यूपर्यंतच्या) काळात जीवनात घडणार्या प्रमुख सोळा प्रसंगी ईश्वराच्या जवळ जाण्यासाठी जिवावर संस्कार करायची शिकवण हिंदु धर्म देतो. त्या दृष्टीने या सदरात सोळा संस्कारांमागील तत्त्वज्ञान आणि विज्ञान, संस्कारांचे अधिकार, संस्कार साजरा करण्याची पद्धत, संस्कारांचे तौलनिक महत्त्व, मुला-मुलींचे नामकरण करतांना नावाची निवड कशी करावी ? संस्कारांच्या अंतर्गत विधींतील अमुक एक कृती अमुक एका पद्धतीने का करायची ? आदर्श लग्नपत्रिका कशी बनवावी ? यांसारख्या सूत्रांचे अध्यात्मशास्त्रीय विवेचन केले आहे.