रावणवधानंतर ‘ब्रह्महत्येचे पातक दूर व्हावे’, यासाठी प्रभु श्रीरामाने पूजलेले श्रीलंकेतील नगुलेश्वरम् मंदिरातील शिवलिंग !
रामायणात ज्या भूभागाला ‘लंका’ किंवा ‘लंकापुरी’ म्हटले आहे, ते स्थान म्हणजे आताचा श्रीलंका देश आहे. त्रेतायुगात श्रीमहाविष्णूने श्रीरामावतार धारण केला आणि लंकापुरीला जाऊन रावणादी असुरांचा नाश केला. आता तेथील ७० टक्के लोक बौद्ध आहेत.