देवशिल्पी विश्‍वकर्मा यांनी दीड लाख वर्षांपूर्वी निर्माण केलेले औरंगाबाद (बिहार) येथील देव सूर्य मंदिर !

बिहार राज्यात औरंगाबाद येथे असलेले देव सूर्य मंदिर वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहे. साक्षात् विश्वकर्म्याने एका रात्रीत हे मंदिर उभारले असल्याचे मानले जाते.

श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या वास्तव्याने पुनित झालेले कर्नाटक मधील जागृत तीर्थक्षेत्र कुरवपूर !

कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यात वसलेले कुरवपूर हे अतिशय जागृत तीर्थक्षेत्र ! कृष्णा नदीने वेढलेल्या या निसर्गरम्य बेटावर श्री दत्तात्रेयांचे पहिले अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांनी १४ वर्षे वास्तव्य केले.

सतना (मध्यप्रदेश) येथील प्रसिद्ध श्री शारदादेवी शक्तीपीठ !

‘सतना, मध्यप्रदेश येथील रामगिरी पर्वतावर श्री शारदादेवीचे मंदिर आहे. श्रीविष्णूने शिवाच्या पाठीवर असलेल्या माता सतीच्या निष्प्राण देहाचे सुदर्शनचक्राने ५१ भाग केले. ज्या ज्या ठिकाणी ते पडले, तेथे शक्तीपीठ निर्माण झाले.

गोंडा, उत्तरप्रदेश येथील श्री वाराहीदेवी !

गोंडा, उत्तरप्रदेश येथील मुकुंदनगर गावात श्री वाराहीदेवीचे मंदिर आहे. मंदिरात अतीप्राचीन वटवृक्ष असून त्याच्या फांद्या मंदिर परिसरात विस्तारलेल्या आहेत. श्री वाराहीदेवी उत्तरी भवानीदेवी या नावानेही ओळखली जाते.

अखंड ज्योतीस्वरूपात असलेली कांगडा, हिमाचल प्रदेश येथील श्री ज्वालादेवी !

या ठिकाणी नैसर्गिकरित्या ९ ज्वाळा तेवत असतात. ९ ज्वाळांमधील प्रमुख ज्वाळा महाकाली देवीची आहे. अन्य ८ ज्वाळा अन्नपूर्णा, चंडी, हिंगलाज, विंध्यवासिनी, महालक्ष्मी, सरस्वती, अंबिका आणि अंजना या देवींच्या आहेत.

हिंदूंचा पराक्रमी राजा विक्रमादित्य यांची कुलदेवी उज्जैन, मध्यप्रदेश येथील श्री हरसिद्धीदेवी !

उज्जैन, मध्यप्रदेश येथील प्रमुख मंदिरांमध्ये श्री हरसिद्धीदेवी मंदिराची गणना होते. ही देवी राजा विक्रमादित्याची कुलदेवी होती. प्राचीन काळी देवी ‘मांगलचाण्डिकी’ या नावाने ओळखली जात असे.

५१ शक्तीपिठांपैकी एक असलेल्या पाटलीपुत्र (पटना) येथील बडी आणि छोटी पटन देवीची मंदिरे !

बडी पटन देवी आणि छोटी पटन देवी !  मानसिंह नावाचा राजा प्रथम पश्चिम द्वाराकडून आलेे म्हणून पहिले मंदिर बडी पटन देवी आणि नंतर पूर्व द्वाराकडून आले म्हणून छोटी पटन देवी मंदिर !

महाकवी कालिदास यांना दिव्य ज्ञान प्रदान करणारी उज्जैन (मध्यप्रदेश) येथील श्री गढकालिकादेवी

लोककथेनुसार शाकुंतलम्, मेघदूत या ग्रंथांचे रचनाकार आणि सम्राट विक्रमादित्य यांच्या सभामंडळातील नवरत्नांपैकी एक प्रमुख रत्न (प्रमुख व्यक्ती) महाकवी कालिदास यांची श्री गढकालिका देवी ही इष्ट देवी (उपासनादेवी) मानली जाते.

भारताच्या सीमांचे रक्षण करणारी जैसलमेर (राजस्थान) जिल्ह्यातील श्री तनोटमाता

वर्ष १९६५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या युद्धाच्या वेळी मंदिरात अनेक चमत्कारिक घटना घडल्या. युद्धाच्या वेळी राजस्थान परिसरात घुसलेल्या पाकिस्तानच्या सैनिकांना हरवण्यात तनोटमाता मंदिराची भूमिका महत्त्वाची ठरली होती.

ज्योतिर्मय रूप असलेली काशी (उत्तरप्रदेश) येथील श्री ब्रह्मचारिणी देवी

काशीतील दुर्गाघाट येथे श्री ब्रह्मचारिणी देवीचे मंदिर आहे. श्री ब्रह्मचारिणी देवीचे रूप ज्योर्तिमय आणि भव्य आहे. देवीच्या एका हातात जपमाळ आणि दुसर्‍या हातात कमंडलू आहे.