५१ शक्तीपिठांपैकी एक असलेली श्रीक्षेत्र काशी (उत्तरप्रदेश) येथील श्री बंदीदेवी
श्रीक्षेत्र काशी येथील दशाश्वमेध घाटावर श्री बंदीदेवीचे मंदिर आहे. ही देवी ५१ शक्तीपिठांपैकी एक आहे.
श्रीक्षेत्र काशी येथील दशाश्वमेध घाटावर श्री बंदीदेवीचे मंदिर आहे. ही देवी ५१ शक्तीपिठांपैकी एक आहे.
झारखंडची राजधानी रांची येथून ८० किलोमीटर अंतरावर रामगढ जिल्ह्यात असलेल्या रजरप्पा गावामध्ये श्री छिन्नमस्तिका देवीचे जगप्रसिद्ध मंदिर आहे. भारतातील प्राचिन मंदिरांपैकी हे एक असून भैरवी आणि दामोदर या नद्यांच्या संगमावर हे मंदिर वसलेले आहे.
नगर शहराचे ग्रामदैवत माळीवाड्यातील श्री सिद्धीविनायक विशाल गणपतीचे मंदिर अत्यंत जागृत तीर्थक्षेत्र असून या मंदिराला २०० वर्षांचा इतिहास लाभला आहे. भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारी ही देवता आणि मंदिर यांची ख्याती दूरपर्यंत आहे.
१४ व्या शतकातील महान गणेशभक्त मोरया गोसावी हे त्यांच्या उत्कट गणेशभक्तीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी पुणे जिल्ह्यातील मोरगांव येथे गणेशाची भक्ती केली.
नगर जिल्ह्यातील पाथर्डी गावापासून १७ किलोमीटर अंतरावर ‘आव्हाणे बुद्रूक’ नावाचे गाव आहे. अवनी नदीच्या तीरावर असणार्या या गावातील श्री गणेशमंदिर प्रसिद्ध आहे. येथील श्री गणेशमूर्ती निद्रावस्थेत विराजमान असून ती दक्षिणोत्तर आहे.
जळगाव जिल्ह्यातील एरंड तालुक्यात निसर्गरम्य परिसर असलेल्या पद्मालय या पवित्र क्षेत्री असलेले श्री गणेशमंदिर सुप्रसिद्ध आहे. या मंदिरातील मूर्ती १०० हून अधिक वर्षांपूर्वी मंदिराजवळ असलेल्या तळ्यात मिळाल्या.
नागपूर शहरात मध्यवर्ती असलेले सिताबर्डी नावाच्या टेकडीवरचे हे मंदिर ! मंदिरात झाडाच्या प्रचंड मोठ्या बुंध्यापाशी असलेली गणेशमूर्ती म्हणजेच टेकडीचा गणपति होय !
नागपूर येथील महाल भागात श्री गणपतीचे प्रसिद्ध आणि जागृत मंदिर आहे. नागपूरचे प्रसिद्ध संगीतकार श्री. मधुसूदन ताम्हणकर यांच्या घरात हे मंदिर आहे. येथील शमी वृक्ष मूळ मंदिरापासून लांब आहे.
रामटेक गडाच्या पायथ्याशी स्थित या मंदिरात अठराभुजा असलेली साडेचार ते पाच फूट उंच, संगमरवरी दगडाची वैशिष्ट्यपूर्ण अतीप्राचीन अशी ही श्री गणेशमूर्ती आहे. तिला अष्टदशभुज असे संबोधतात.
वर्धा जिल्ह्यातील केळझर येथे ‘वरद विनायक’ श्री गणपतीचे मंदिर असून ते सर्वदूर सुपरिचित आहे. केळझर हे नागपूरहून ५२ किमी अंतरावर असून टेकडीच्या कुशीत वसलेले निसर्गरम्य ठिकाण आहे.