महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या काही देवींची माहिती आणि त्यांचा इतिहास
२१ ऑक्टोबर २०२३ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘महालक्ष्मी, मुंबई; शिवनेरीची शिवाई, जिल्हा पुणे; प्रतापगडाची भवानीमाता, जिल्हा सातारा; श्री तुळजाभवानी, जिल्हा धाराशिव..
२१ ऑक्टोबर २०२३ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘महालक्ष्मी, मुंबई; शिवनेरीची शिवाई, जिल्हा पुणे; प्रतापगडाची भवानीमाता, जिल्हा सातारा; श्री तुळजाभवानी, जिल्हा धाराशिव..
सप्तर्षींनी सांगितल्याप्रमाणे या प्रवासात श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी हिमाचल प्रदेश राज्यातील कुलु जिल्ह्यातील विविध दैवी स्थानांचे दर्शन घेतले आणि ‘हिंदु राष्ट्राची स्थापना लवकरात लवकर व्हावी अन् आपत्काळात साधकांचे रक्षण व्हावे’, यासाठी प्रार्थना केली.
सप्तर्षींनी पुढे सांगितले, ‘‘चोटीला गावात डोंगरावर ‘चंडी-चामुंडा’ नावाच्या देवींच्या मूर्ती आहेत. या देवी दोन दिसत असल्या, तरी त्या एकच (एकरूप) आहेत. चंडी आणि चामुंडा ही आदिशक्तीची रूपे आहेत. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी असलेल्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या दोघी चंडी अन् चामुंडा यांची रूपे आहेत.
देवभूमी हिमाचल प्रदेश येथे कुल्लु नावाचे नगर आहे. या नगराच्या चारही दिशांना अनेक दैवी स्थाने आहेत. ‘कुल्लु’ म्हणजे पूर्वीच्या काळातील ‘कुलांतपीठ !’ जेथे मनुष्यकुळ संपते आणि देवकुळ चालू होते, म्हणजेच जे देवतांचे निवासस्थान आहे, ते म्हणजे ‘कुलांतपीठ !’ अशा कुलु प्रदेशात ‘मणिकर्ण’ नावाचे स्थान आहे.
कर्नाटक राज्यातील चिक्कमगळुरू जिल्ह्यात तुंगा नदीच्या काठी शृंगेरी नावाचे गाव आहे. येथील पर्वतावर पूर्वी शृंगऋषि रहायचे; म्हणून या स्थानाला ‘शृंग गिरि’ असे नाव पडले. पुढे शृंगगिरीचे रूपांतर ‘शृंगेरी’ असे झाले. २ सहस्र ६०० वर्षांपूर्वी आद्य शंकराचार्य या ठिकाणी आले होते.
त्रिपुरा राज्यातील उदयपूर शहरानजीक माताबरी गावात श्री त्रिपुरासुंदरीदेवीचे मंदिर आहे. हे ५१ शक्तिपिठांपैकी एक पीठ आहे. येथे सतीच्या डाव्या पायाची बोटे पडली होती.
हिंगलाजमाता मंदिर हे ५१ शक्तिपिठांपैकी एक असून ते पाकिस्तानमध्ये आहे. या ठिकाणी सतीचे ब्रह्मरंध्र (डोके) पडले होते. हिंगोल नदीच्या काठावर आणि मकरान वाळवंटाच्या खेरथार टेकड्यांत वसलेले श्री हिंगलाजमाता मंदिर कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान आहे.
५१ शक्तिपिठांपैकी ५ शक्तिपिठे बंगालच्या बीरभूम जिल्ह्यामध्ये आहेत. बकुरेश्वर, नालहाटी, बंदीकेश्वरी, फुलोरादेवी आणि तारापीठ ही ती शक्तिपिठे होत. द्वारका नदीच्या काठावरील महास्मशानामध्ये पांढर्या शिमूल वृक्षाखाली सतीच्या तिसर्या नेत्रातील बाहुलीतील तारा पडला; म्हणून याला ‘तारापीठ’ म्हटले जाते.
श्री वैष्णोदेवी मंदिर हिंदु धर्मियांसाठी एक पवित्र स्थळ आहे. श्री वैष्णोदेवीला ‘माता राणी’ म्हणूनही संबोधले जाते. जम्मू जिल्ह्यातील कटरा येथून १४ किलोमीटर चढण चढल्यानंतर एका डोंगरावर हे मंदिर आहे. अतिशय जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या या ठिकाणी देशभरातून लक्षावधी भाविक दर्शनाला येतात.
श्री बगलामुखीदेवीचे मंदिर कांगडा (हिमाचल प्रदेश) जिल्ह्यातील बनखंडी गावामध्ये आहे. पांडुलिपीमध्ये देवीचे जसे वर्णन आहे, त्याच स्वरूपात देवी येथे विराजमान आहे. देवीचे हे मंदिर महाभारत काळातील आहे.