गोमूत्राच्या साहाय्याने जलप्रदूषणावर परिणामकारक उपाय !
शिवाजी विद्यापिठाचे विद्यार्थी प्रशांत सावळकर आणि ऋतुजा मांडवकर या २ युवा संशोधकांनी देशी गीर गायीच्या मूत्राच्या (गोमूत्राच्या) साहाय्याने चांदी धातूचे विघटन करून त्यापासून रूपेरी सूक्ष्म कण (नो पार्टिकल्स) सिद्ध केले आहेत. ‘चांदीचे हे अब्जांश कण (सिल्व्हर नॅनो पार्टिकल्स) वस्त्रोद्योगातून बाहेर सोडल्या जाणार्या अत्यंत विषारी पाण्याच्या शुद्धीकरणासाठी वापरता येऊ शकतात’, असे संशोधनातून समोर आले आहे.