॥ श्रीमद्भगवद्गीता ॥ अध्याय १६ – दैवासुरसंपद्विभागयोग
काम, क्रोध आणि लोभ ही नरकाची तीन द्वारे आहेत; म्हणून या तिघांचा त्याग करावा. या तिघांपासून मुक्त असलेला मनुष्य आपले कल्याण होईल, असे आचरण करतो.
काम, क्रोध आणि लोभ ही नरकाची तीन द्वारे आहेत; म्हणून या तिघांचा त्याग करावा. या तिघांपासून मुक्त असलेला मनुष्य आपले कल्याण होईल, असे आचरण करतो.
सत् हा शब्द सत्य आणि साधुत्वासाठी, तसेच उत्तम मांगलिक कार्यांसाठी योजला जातो. यज्ञ, दान अन् तप यांची स्थिती सत् असते; म्हणून परमात्म्यासाठी केलेल्या कर्मांना सत् म्हणतात.
परमात्म्यालाच आपले सर्वस्व मानून, ईश्वराचेच चिंतन करत तन-मन-धनाने आपली स्वाभाविक आणि शास्त्रविहित कर्मे ईश्वरालाच अर्पण करीत करणे, हे आपल्या कर्मांनीच ईश्वराची पूजा करणे आहे.
प्राचीन युगातील सर्व रमणीय वस्तूंमध्ये भगवद्गीतेपेक्षा श्रेष्ठ कोणतीही वस्तू नाही. गीतेत असे उत्तम आणि सर्वव्यापक ज्ञान आहे की, तिच्या रचनाकार देवास असंख्य वर्षे झाली, तरीही असा दुसरा एकसुद्धा ग्रंथ लिहिला गेला नाही.
गीता हा हिंदूंचा धर्मग्रंथ आहे. साधनेच्या विविध मार्गांचा उहापोह यात केला आहे. व्यष्टी आणि समष्टी स्तरावर साधना करून जीवाने स्वतःचा उत्कर्ष कसा साधून घ्यावा, याविषयी माहिती यात आहे; मात्र याच धर्मग्रंथावर काही लोक वारंवार टीका करतांना दिसतात. अरविंद मलगट्टी यांनीही गीतेवर अशाच प्रकारे टीका केली आहे. त्याचे खंडण येथे दिले आहे. १. आरोप : … Read more
‘रामनाथी आश्रमातील साधकांना योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या ‘अ’ आणि ‘आ’ या दोन छायाचित्रांच्या संदर्भात प्रयोग करायला सांगितला होता. त्या वेळी दोन्ही छायाचित्रांकडे पाहून जाणवलेली सूत्रे येथे देत आहे.
जगात ख्रिस्त्यांची १५७, मुसलमानांची ५२, बौद्धांची १२, तर ज्यूंचे १ राष्ट्र आहे. हिंदूंचे राष्ट्र या सूर्यमंडळात कोठे आहे ? होय, हिंदूंचे एक सनातन राष्ट्र (हिंदुस्थान) वर्ष १९४७ पर्यंत या पृथ्वीवर होते. काय आहे या राष्ट्राची आजची स्थिती ? याविषयी जाणून घ्या.
आद्य शंकराचार्यांनी स्थापलेली चार
पिठे ही हिंदु धर्माची परमोच्च श्रद्धास्थाने ! आद्य शंकराचार्यांनी सनातन वैदिक हिंदु धर्माच्या रक्षणार्थ भारतात चहुदिशांना चार शांकरपिठांची स्थापना केली.
‘देव’ म्हणजे नेमके काय, हे जाणून घेण्याची प्रत्येकाची जिज्ञासा असते. प्रस्तुत लेखात आपण ‘देव’ आणि ‘देवी’ या शब्दांचे अर्थ तसेच देवांना अनेक नावे असण्यामागील कारणे पाहू.
ईश्वर जेव्हा विशिष्ट कार्याच्या पूर्तीसाठी मनुष्य अथवा प्राण्याचे शरीर धारण करून भूलोकी येतो, तेव्हा त्याला ‘अवतार’ असे म्हणतात.