भक्तांच्या मनात भाव आणि भक्ती निर्माण करणारा श्री चिंतामणीचा महिमा !
यवतमाळपासून २३ कि.मी. अंतरावर श्री क्षेत्र कळंब गावातील प्रसिद्ध श्री चिंतामणि मंदिर हे लक्षावधी भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
यवतमाळपासून २३ कि.मी. अंतरावर श्री क्षेत्र कळंब गावातील प्रसिद्ध श्री चिंतामणि मंदिर हे लक्षावधी भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
महर्षि गृत्समदांनी श्री गणेशाची स्थापना केली. श्री क्षेत्र थेऊर (जिल्हा पुणे) येथे स्थापलेल्या श्री गणेशाचे नावही चिंतामणि हेच आहे. हे क्षेत्र आज अष्टविनायकांपैकी एक प्रसिद्ध क्षेत्र आहे.
श्रीमद्भगवद्गीतेचा महिमा गंगा नदीपेक्षाही अधिक आहे. श्रीमद्भगवद्गीता ही गायीसमान आहे आणि तिचे दूध काढणारा गोपाळ हा भगवान श्रीकृष्ण आहे. गीतारूपी दुग्ध हे वेदांचे सार आणि अर्जुन हा गोवत्सासारखा (वासरासारखा) आहे. विवेकी महात्मे आणि शुद्ध भक्त या गीतारूपी दुग्धामृताचे पान करतात.
भगवान श्रीकृष्ण ! नाव घेताच मन आदराने आणि आनंदाने भरून जाते.
श्रीमद्भगवद्गीतेतील ‘अर्जुनविषादयोग’ अध्यायात अर्जुनाला आपल्या विरुद्ध लढायला उभ्या राहिलेल्या लोकांमध्ये आपलेच नातेवाईक दिसले. आप्तांना मारावे लागणार, हे पाहून अर्जुनाला विषाद झाला. त्याविषयीची पुढील कारणे त्याने भगवान् श्रीकृष्णांना सांगितली.
सांख्यशास्त्राची जी तत्त्वे आहेत, ती सनातन धर्माची मूलभूत तत्त्वे आहेत. सनातन धर्म आणि इतर धर्म यांतील अंतर काय ? तेही या तत्त्वांनी स्पष्ट होते. ती तत्त्वे पुढीलप्रमाणे आहेत.
बुद्धीयोग हा कर्मयोग आहे. कर्मे कशी करायची, याविषयीची बुद्धी श्रीकृष्णांनी पुढीलप्रमाणे सांगितली आहे.
कर्मफळांची आसक्ती न ठेवता मनुष्याने कर्तव्य म्हणून कर्म केले पाहिजे; कारण अनासक्त होऊन कर्म केल्याने (चित्तशुद्धी होऊन पुढे) त्याला परमेश्वराची प्राप्ती होते.
आत्मज्ञानाची प्राप्ती आणि कर्मसंन्यास म्हणजे कर्माच्या फळांचा त्याग हा संन्यास यांचे उपाय सांगितलेले असल्याने अध्यायाचे नाव ज्ञानकर्मसंन्यासयोग असे आहे.
कर्मसंन्यासयोग हा कर्ममुक्तीचा मार्ग आहे. कर्मांमधील कर्तेपणा सोडल्याने आत्मशुद्धी होते. पुढे ज्ञानप्राप्ती होऊन मोक्षरूप परमशांती मिळते.