आदर्श व्यक्तीमत्त्व श्रीरामभक्त हनुमान !

सध्या ‘व्यक्तीमत्त्व विकास’ हा अगदी शाळकरी मुलांमध्येही प्रचंड आवडीचा विषय आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या व्यक्तीमत्त्व विकासासाठी सहस्रो रुपयांचे वर्ग लावण्यापेक्षा हनुमंताचे चरित्र वाचले, तरीही आपल्याला बरेच काही शिकायला मिळेल. तसेच व्यक्तीमत्त्व कसे असावे, याचे उत्तम उदाहरण श्रीरामचंद्र आणि हनुमंत यांच्या कार्यातून आपल्याला पहायला मिळेल. त्यासाठी हा लेखनप्रपंच !

प्रभु श्रीरामांचा जन्म होण्यामागे अनेक उद्देश असणे !

‘रामचरितमानसनुसार, ‘हरिचा अवतार ज्या कारणामुळे होतो, ते तेवढेच एक कारण आहे’, असे म्हणता येत नाही.’ श्रीहरिच्या रामावतारामध्ये अशी ज्ञात आणि अज्ञात अनेक कारणे आहेत, जी विविध कल्पे-युग यांमध्ये प्रभु श्रीराम यांचा जन्म होण्यासाठी सुनिश्चित केली जातात.

सिक्कीममधील ‘गणेश टोक’ या जागृत मंदिराचे श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी दर्शन घेतले !

वर्ष १९५२ मध्ये भारत सरकारचे एक उच्चपदस्य अधिकारी श्री. अप्पाजी पंत जे मूळचे महाराष्ट्रातील होते, त्यांची सिक्कीम राज्यात नियुक्ती झाली होती. श्री. अप्पाजी पंत हे धार्मिक प्रवृत्तीचे आणि देवाचे भक्त होते.

मुलांना नुसती भगवद्गीता शिकवण्यापेक्षा साधना शिकवणे अधिक योग्य !

बर्‍याचदा लहान आणि युवावस्थेतील मुले यांना भगवद्गीता वाचण्यास किंवा पाठ करण्यास सांगितले जाते; मात्र ‘त्यांना त्यांच्या सध्याच्या स्थितीला गीतेचा खरोखर किती उपयोग होईल’, याकडे लक्ष दिले जात नाही.

वनौषधी आणि ऐतिहासिक स्थाने असलेले लातूर येथील ‘संजीवनी बेट’ !

भारतामध्ये असणार्‍या ऐतिहासिक आणि जीवनोपयोगी अमूल्य ठेव्याकडे दुर्लक्ष करणारा पुरातत्व विभाग काय कामाचा ? असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ? ‘सरकारने पुरातत्व विभागाला याकडे लक्ष देऊन त्याचे संवर्धन करण्यास भाग पाडावे’, असेच जनतेला वाटते !

भोळ्याभावाच्या माध्यमातून भक्तीचे रहस्य अनुभवणारे ईश्वरपूर (सांगली) येथील श्री. राजाराम भाऊ नरुटे (वय ८९ वर्षे) संतपदी विराजमान !

आज पांडुरंगाची ‘एकादशी’ आणि आजच्याच दिवशी विठ्ठलाने नरुटेकाकांना संतपदी विराजमान केले. यातून सर्वकाही कसे ईश्वरनियोजित असते, हे लक्षात येते.

गुरु ग्रह अस्तंगत (मावळत) असतांना कोणती कार्ये करावीत ?

‘या वर्षी २३.२.२०२२ पासून २०.३.२०२२ पर्यंत गुरु ग्रहाचा अस्त आहे. प्रत्येक वर्षी सूर्याच्या सान्निध्यामुळे मंगळ, बुध, गुरु, शुक्र आणि शनि हे ग्रह अस्तंगत होत असतात (मावळतात). त्यामध्ये धर्मशास्त्राने आणि मुहूर्त शास्त्रकारांनी गुरु अन् शुक्र यांच्या अस्तंगत कालावधीस विशेष महत्त्व दिले आहे.

कर्नाटक राज्यातील मंदिरांचा इतिहास

सप्तर्षींच्या आज्ञेने श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी कर्नाटक राज्यातील दक्षिण कन्नड जिल्ह्यात असलेले कटीलू येथील श्री दुर्गापरमेश्वरी मंदिर, धर्मस्थळ येथील श्री मंजुनाथेश्वर मंदिर आणि उडुपी येथील श्रीकृष्ण मंदिरात जाऊन साधकांसाठी प्रार्थना केली.

श्रीरामावतार होण्यासाठी ‘पुत्रकामेष्टी’ याग करणारे शृंगीऋषि यांच्या बागी (हिमाचल प्रदेश) येथील तपोभूमी

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिमाचल प्रदेश राज्यातील कुलु जिल्ह्यातील विविध दैवी स्थानांना भेट देऊन ‘आपत्काळात साधकांचे रक्षण व्हावे आणि ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना व्हावी’, यासाठी प्रार्थना केली. अशा या दैवी क्षेत्रांतील कुलु प्रदेशात अनेक ऋषींची तपस्थाने आहेत. तेथे असलेल्या ‘शृंगीऋषि’ यांच्या तपस्थानाविषयी जाणून घेऊया.