सर्वश्रेष्ठ राष्ट्र निर्माण करणारी वैदिक शिक्षणपद्धत !
पूर्वीच्या काळी वैदिक शिक्षणपद्धत होती. त्यामुळे भारत सर्वश्रेष्ठ असे राष्ट्र होते. ते इतके समृद्ध होते की, त्या वेळी भारतामध्ये सोन्याचा धूर निघत होता, असे म्हटले जाते. या वैदिक शिक्षण पद्धतीचा पाया आध्यात्मिक होता. तसेच हे वैदिक शिक्षण कालातीत आणि हितकारी असल्यामुळेच त्या शिक्षणप्रणालीतून सिद्ध झालेले विद्यार्थी राष्ट्राला उच्च स्थानावर नेऊन पोचवत होते.