प.पू. स्वामी स्वरूपानंद यांच्याशी निगडित अमूल्य ठेवा असलेले कोल्हापूर येथील स्वामी स्वरूपानंद मठ (श्री.जामसंडेकर निवास)

रत्नागिरी जिल्ह्यातील पावस येथील थोर संत प.पू. स्वामी स्वरूपानंद यांचे आध्यात्मिक कार्य अलौकिक आहे. या आध्यात्मिक ठेव्याचा लाभ अनेक भाविकांना आजही होत आहे. कोल्हापूर येथील श्री. जामसंडेकर निवास येथे प.पू. स्वामी स्वरूपानंद यांचा मठ आहे.

भृगुसंहिता आणि सप्तर्षि जीवनाडी

सप्तर्षि जीवनाडीपट्टीतील संवाद हा वसिष्ठ आणि विश्‍वामित्र यांच्यातील आहे, तर भृगुसंहितेतील संवाद हा भृगुमहर्षि आणि त्यांचा पुत्र शुक्र यांच्यामधील आहे. यांत शुक्राने विचारलेल्या प्रश्‍नांना भृगुमहर्षि उत्तर देतात.

प.पू. डॉक्टरांचे आरोग्य सुधारावे आणि हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, यांसाठी अविश्रांतपणे धडपडणारे अश्‍वमेधयाजी प.पू. नाना काळेगुरुजी

दुसरा अश्‍वमेध करणे, म्हणजे शिवधनुष्य उचलल्यासारखेच आहे; कारण हा यज्ञ जवळजवळ दीड वर्ष चालतो आणि प्रतिदिन ८ घंट्यांचे (तासांचे) कर्म करावे लागते. खरंच, संतच हिंदु राष्ट्र येण्यासाठी एवढे कष्ट घेऊ शकतात. संकटातून संतच आपल्याला वाचवू शकतात. हेच प.पू. नानांच्या उदाहरणातून लक्षात येते.

भगवान श्रीकृष्णाचे अस्तित्व अनुभवलेल्या काही स्थानांचे छायाचित्रात्मक दिव्यदर्शन !

श्रीकृष्णासम सखा, गुरु, माय-बाप कोणी नाही, हे जो जाणतो, तो खरा भक्त ! भगवान श्रीकृष्णाला अनन्यपणे शरण जाणारा भक्त संसारसागरातून मुक्त होतो. श्रीकृष्णाप्रती भाव वाढवण्यासाठी त्याच्या दिव्य जीवनाशी निगडित दैवी क्षेत्रांची छायाचित्रे येथे दिली आहेत.

भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य- भारतियांचे निसर्गाशी असलेले स्नेहसंबंध !

आमच्या ऋषीमुनींनी निसर्गाच्या सान्निध्यात अनेक वर्षे साधना करून निसर्गाशी जवळीक साधली. त्यांनी निसर्गाच्या सहवासात जीवन व्यतीत करून निसर्गाशी एकरूप होऊन नैसर्गिक शक्तींची अनेक गूढ रहस्ये उकलून विश्‍वापुढे ज्ञानाचे नवे दालन उघडले.

क्रांतीविरांचे ऋण फेडून राष्ट्रधर्माचे पालन करण्यासह साधनेतील पूर्णत्वही साधा !

आज हिंदुस्थानची पावन भूमी भ्रष्टाचार्‍यांनी कलंकित; जिहादी आतंकवाद्यांच्या आघातांनी विदीर्ण; धर्मांध, जात्यंध अन् राष्ट्रद्रोही यांच्या विषारी डंखांनी घायाळ आणि तथाकथित पुरोगामी अन् नास्तिकतावादी यांच्यामुळे धर्मभ्रष्ट झाली आहे.

हिंदु राष्ट्रातील धर्मध्वज

विश्‍वकल्याणासाठी सात्त्विक लोकांनी चालवलेले भावी हिंदु राष्ट्र धर्माधिष्ठित असेल. त्यामुळे हिंदु राष्ट्रात राष्ट्रध्वज नाही, तर धर्मध्वज असेल. याचे कारण म्हणजे राष्ट्रध्वजापेक्षा धर्मध्वज महत्त्वाचा.

कन्यागत महापर्वकाल !

कन्यागत म्हणजे कन्या राशीमध्ये गेलेला. गुरु ग्रहाने कन्या राशीतून तूळ राशीमध्ये प्रवेश केल्यानंतर पुन्हा गंगा कुंड पुढील ११ वर्षे कोरडे रहाते. १२ वर्षांनंतर गुरु ग्रहाने कन्या राशीत प्रवेश केल्यानंतर पुन्हा गंगा कुंडातून जलप्रवाह चालू होतो. या वेळी गंगा नदी कृष्णा आणि वेण्णा या नद्यांना भेटायला येते.

निस्सीम सेवेने भगवान दत्तात्रयांचे दर्शन झालेले संत एकनाथ महाराज !

गुरुकृपेने भगवंताची भेट होते, हे समजल्यानंतर वयाच्या १२ व्या वर्षी (आकाशवाणीच्या निर्देशानुसार) नाथ देवगिरी (दौलताबाद) येथे पोचले. तेथे दत्तभक्त जनार्दनस्वामी किल्लेदार म्हणून होते. नाथांनी त्यांना पाहिले आणि त्यांना सद्गुरु मानून त्यांची मनोभावे सेवा केली.

स्वस्तिक हे चिन्ह ११ सहस्र वर्षे प्राचीन ! – संशोधकांचा निष्कर्ष

स्वस्तिक हे चिन्ह किमान ११ सहस्र वर्षे जुने आहे. हे चिन्ह आर्य संस्कृतीच्या आणि सिंधू संस्कृतीच्याही आधीपासून अस्तित्वात होते.