प्रतिकूल परिस्थितीत मन वज्रशाली करण्यासाठी गीतेचे साहाय्य घेणारे सावरकर
सावरकरांना लंडनमध्ये पकडून बोटीने भारतात आणले जात होते. फ्रान्सच्या मार्सेलिसहून त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण ते पकडले गेले. त्यांना बोटीवर खोलीत कोंडले. मुसलमान पहारेकरी नेमले. आता आपला अमानुष छळ होणार, हे जाणून मनाला वज्रशाली करण्याकरिता त्यांना गीता आठवली.