प.पू. पांडे महाराज यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ‘ने मजसी ने परत मातृभूमीला….’ या काव्यावर केलेले भाष्य !

‘सावरकरांनी ‘ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा, प्राण तळमळला ।’ या काव्यातून सागराला उद्देशून त्यांचे मनोगत व्यक्त केले आहे. ते म्हणतात, ‘‘हे सागरा, मी अशा संकटात सापडलो आहे की, आता मी परत माझ्या मातृभूमीला परत जाईन किंवा नाही’, असे वाटते.

शनैश्‍चर देवाचे माहात्म्य, त्याची वैशिष्ट्ये !

२५.५.२०१७ या दिवशी, म्हणजे वैशाख अमावास्येला शनैश्‍चर जयंती आहे. त्यानिमित्त शनिदेवाच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. शनैश्‍चर जयंतीचे औचित्य साधून लिहिलेल्या या लेखातून आपण शनिदेवाची महती जाणून घेऊया.

मंगळुरु येथील देवी उपासक श्री. उदयकुमार यांच्याशी देवीच्या आज्ञेने परात्पर गुरु डॉ. आठवले आणि हिंदु राष्ट्र यांच्याविषयी झालेला संवाद !

श्री. उदयकुमार हे मंगळुरु येथे रहाणारे असून ते देवीचे भक्त आहेत. गेल्या २५ वर्षांपासून ते ध्यान-साधना करत आहेत. रेकी आणि योगनिद्रा यांमध्ये त्यांचे विशेष प्राविण्य आहे. गत जन्मांविषयी सांगणे, हेसुद्धा त्यांचे वैशिष्ट्य आहे.

मनाली, हिमाचल प्रदेश या ठिकाणी असलेले श्रीरामाचे कुलगुरु श्री वसिष्ठ ऋषी यांचे तपोस्थान !

ऋषी-मुनी सत्य सांगतात; म्हणून काळ त्यांच्या नावाला आणि शिकवणीला स्पर्श करू शकत नाही.

श्रीक्षेत्र नीरा-नृसिंहपूरचा महिमा

पुणे जिल्ह्याच्या आग्नेय दिशेला नीरा आणि भीमा या नद्यांच्या संगमतटावर श्रीक्षेत्र नीरा-नृसिंहपूर वसलेले आहे. ज्यांचे कुलदैवत नृसिंह आहे, त्यांनी या तीर्थक्षेत्री जाऊन श्री नृसिंहाचे दर्शन घ्यावे. पद्मपुराणात म्हटले आहे, हिरण्यकश्यपूची पत्नी कयाधू हिचे इंद्रदेवाने हरण केले. त्या वेळी कयाधू गर्भवती होती.

भक्ताच्या प्रेमशक्तीचे श्रेष्ठत्व दाखवून देणारा नृसिंह अवतार !

भगवान श्रीविष्णूंचा चौथा अवतार, म्हणजे नृसिंह अवतार होय. ९.५.२०१७ या दिवशी नृसिंह जयंती आहे. विदर्भात आणि उर्वरित महाराष्ट्रात अनेकांचे कुलदैवत लक्ष्मीनृसिंह आहे. त्या निमित्ताने नृसिंहाची आध्यात्मिक माहिती देणारा हा लेख प्रकाशित करत आहोत.

पुणे येथील थोर संत प.पू. आबा उपाध्ये यांनी संगीताच्या माध्यमातून साधना यासंदर्भात सांगितलेली मार्गदर्शक सूत्रे !

लहानपणापासूनच प.पू. आबा उपाध्ये यांना संगीताची आवड होती. साधारण वर्ष १९३१ च्या काळात हिज मास्टर्स व्हॉईस या लंडनच्या कंपनीने भारतात प्रवेश केला. या कंपनीची एजन्सी प.पू. आबांच्या मोठ्या भावाने घेतली होती.

धर्मसाम्राज्याचे संस्थापक जगद्गुरु आद्यशंकराचार्य

ख्रिस्तपूर्व ५०० वर्षांपूर्वी आद्य शंकराचार्यांचा जन्म झाला. अवघ्या ३२ वर्षांच्या अवतारकार्यात शंकराचार्यांनी मोठमोठ्या नगरांत आणि तीर्थक्षेत्री जाऊन वैदिक धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी त्यांच्या शिष्यांसह भारतभ्रमण केले अन् त्यांना अद्वैत तत्त्वज्ञानाची शिकवण दिली.

कमळाच्या देठांपासून कागदनिर्मिती करणारे राजा भोज !

प्राचीन इजिप्तमध्ये पपायरस नावाच्या झाडापासून कागद बनवत, हे शाळेत आवर्जून शिकवतात; पण कागदनिर्मितीचा खरा इतिहास वेगळाच आहे. मावळा म्हणजे प्राचीन भारतातील ‘मालव’ प्रांत. त्याची राजधानी म्हणजे धार किंवा धारानगरी.

एकमेवाद्वितीय महर्षि व्यास

व्यास शब्दाची व्युत्पत्ती आहे – विशदं करोति इति व्यासः । म्हणजे विषय विशद करतो तो व्यास. व्यासांची अनेक नावे प्रचलित आहेत. वर्णाने काळे म्हणून त्यांना कृष्ण म्हणत; तर द्वीपात (बेटावर) जन्मले म्हणून द्वैपायन म्हणत.