संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीतून उलगडले अमूल्य ज्ञानमोती !

भगवंताला कोणता भक्त प्रिय असतो ? तर ‘सगळे विश्‍वच माझे घर आहे’, अशी ज्याची दृढ समजूत आहे; किंबहुना जो स्वतःच चराचर सृष्टी बनला आहे, असा भक्त.

ज्योतिषशास्त्रानुसार व्याधी निवारणासाठी औषध सेवनाचे मुहूर्त आणि रुग्णाईत व्यक्तीची सेवा करणार्‍या सेवकाच्या कुंडलीतील योग

औषध चालू करतांना शक्य असल्यास आवश्यक नक्षत्र, तिथी, वार पाळावेत. तसे करणे शक्य नसल्यास धन्वंतरी देवतेचा प्रसाद समजून औषध ग्रहण करावे.

पू. (डॉ.) जयंत करंदीकर यांचा परिचय

पू. (डॉ.) जयंत करंदीकर हे हृदयरोग विशेषज्ञ आहेत. त्यांना आधुनिक वैद्य म्हणून कार्य करून पुष्कळ पैसे मिळवता आले असते; परंतु त्यांनी तसे न करता त्यांचे संपूर्ण आयुष्य ॐकार साधनेसाठी दिले आहे.

२०० वर्षांचा इतिहास लाभलेला अन् नगर शहराचे श्रद्धास्थान श्री विशाल गणपति !

नगर शहराचे ग्रामदैवत माळीवाड्यातील श्री सिद्धीविनायक विशाल गणपतीचे मंदिर अत्यंत जागृत तीर्थक्षेत्र असून या मंदिराला २०० वर्षांचा इतिहास लाभला आहे. भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारी ही देवता आणि मंदिर यांची ख्याती दूरपर्यंत आहे.

थेऊर (जिल्हा पुणे) येथील गणेशभक्त मोरया गोसावी यांच्या उपासनेचे स्थान !

१४ व्या शतकातील महान गणेशभक्त मोरया गोसावी हे त्यांच्या उत्कट गणेशभक्तीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी पुणे जिल्ह्यातील मोरगांव येथे गणेशाची भक्ती केली.

आव्हाणे बुद्रूक (जिल्हा नगर) येथील निद्रावस्थेतील दक्षिणोत्तर श्री गणेशमूर्ती !

नगर जिल्ह्यातील पाथर्डी गावापासून १७ किलोमीटर अंतरावर ‘आव्हाणे बुद्रूक’ नावाचे गाव आहे. अवनी नदीच्या तीरावर असणार्‍या या गावातील श्री गणेशमंदिर प्रसिद्ध आहे. येथील श्री गणेशमूर्ती निद्रावस्थेत विराजमान असून ती दक्षिणोत्तर आहे.

हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व कथन करणाऱ्या पद्मालय (जिल्हा जळगांव) येथील अतिप्राचीन डाव्या आणि उजव्या सोंडेच्या स्वयंभू श्री गणेशमूर्ती !

जळगाव जिल्ह्यातील एरंड तालुक्यात निसर्गरम्य परिसर असलेल्या पद्मालय या पवित्र क्षेत्री असलेले श्री गणेशमंदिर सुप्रसिद्ध आहे. या मंदिरातील मूर्ती १०० हून अधिक वर्षांपूर्वी मंदिराजवळ असलेल्या तळ्यात मिळाल्या.

नागपूर येथील स्वयंभू, २५० वर्षांहून अधिक प्राचीन आणि विदर्भातील अष्ट गणेशांपैकी एक असलेला टेकडीचा गणपति !

नागपूर शहरात मध्यवर्ती असलेले सिताबर्डी नावाच्या टेकडीवरचे हे मंदिर ! मंदिरात झाडाच्या प्रचंड मोठ्या बुंध्यापाशी असलेली गणेशमूर्ती म्हणजेच टेकडीचा गणपति होय !

महाल, नागपूर येथील जागृत श्री गणपति मंदिर !

नागपूर येथील महाल भागात श्री गणपतीचे प्रसिद्ध आणि जागृत मंदिर आहे. नागपूरचे प्रसिद्ध संगीतकार श्री. मधुसूदन ताम्हणकर यांच्या घरात हे मंदिर आहे. येथील शमी वृक्ष मूळ मंदिरापासून लांब आहे.

प्रभु श्रीरामचंद्रांच्या अस्तित्वाने पावन झालेल्या रामटेक (जिल्हा नागपूर) येथील प्राचीन अष्टदशभुज श्री गणेशमूर्ती !

रामटेक गडाच्या पायथ्याशी स्थित या मंदिरात अठराभुजा असलेली साडेचार ते पाच फूट उंच, संगमरवरी दगडाची वैशिष्ट्यपूर्ण अतीप्राचीन अशी ही श्री गणेशमूर्ती आहे. तिला अष्टदशभुज असे संबोधतात.