कुठे मानसिक स्तरावर देवतांना टोपण नावे देऊन त्यांची विटंबना करणारे सध्याचे जन्महिंदू, तर कुठे देवालयांसह माणसांनाही देवतांची नावे देऊन सतत ईश्वरी अनुसंधान साधणारे हिंदूंचे पूर्वज !
देवतेच्या अनेक नामांपैकी केवळ एकाच नामावर आपले मन, बुद्धी आणि चित्त एकाग्र करून त्याचे स्मरण केल्याने अनुसंधान साधता येते. हे साध्य करण्यासाठी पूर्वीच्या काळी मुलांना ‘केशव, माधव, पांडुरंग, राधा, सीता, गौरी’, अशी देवतांची नावे ठेवली जात आणि त्याच नावाने त्यांना हाक मारली जात असे.