समर्थांची शिकवण तंतोतंत आचरणात आणणारे आणि समर्थांएवढीच परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर श्रद्धा असणारे ज्येष्ठ समर्थभक्त कै. पू. सुनीलजी चिंचोलकर !
‘पू. चिंचोलकरकाका दासबोध, रामायण या किंवा अन्य विषयांवर प्रवचने करायचे. ‘त्यांनी त्यावर केवळ आध्यात्मिक निरूपण केले’, असे कधीच झाले नाही. रामायणातील प्रसंग आणि सद्यःस्थिती सांगून ते श्रोत्यांना समष्टी साधना करण्यासाठी उद्युक्त करत असत. राष्ट्र आणि धर्म यांच्यावर होणारे आघात मांडून ते जागृती करत.