लोकशाहीतील दुष्प्रवृत्तींविरुद्ध लढा दिल्यासच हिंदु राष्ट्राची स्थापना शक्य !

राजकीय पक्षांवर अवलंबून न रहाता समाजहितासाठी सतत कार्यरत असलेले समाजसेवक, देशावर आत्यंतिक प्रेम असलेले देशभक्त आणि हिंदु धर्मसंस्कृतीविषयी आस्था असलेले धर्मप्रेमी यांनी एकत्रित येऊन कार्य करणे, ही काळाची आवश्यकता आहे.

लोकहो, दुष्प्रवृत्तींच्या विरोधात कृती केल्यासच ‘हिंदु राष्ट्रा’चा पाया रचला जाईल !

आपण प्रत्येकाने ध्येयनिष्ठ बनून आणि संघटित होऊन अन्याय करणा-या दुष्प्रवृत्तींच्या विरोधात कृती केल्यास निश्चितच पुढच्या पिढीसाठी एका आदर्श राज्यव्यवस्थेचा, म्हणजेच रामराज्याची अनुभूती देणा-या ‘हिंदु राष्ट्रा’चा पाया रचला जाईल.

दैनंदिन जीवनात जनतेला छळणार्‍या लोकशाहीतील दुष्प्रवृत्ती

‘शासनाकडे कर भरत असूनही प्रत्येक ठिकाणी जर लुबाडणूक आणि फसवणूक केली जात असेल, तर तो स्वतःवर होणारा सामाजिक अन्याय आहे’, हे प्रत्येक नागरिकाने लक्षात घेतले पाहिजे.

रामराज्यासारखी आदर्श राज्यव्यवस्था आणण्यासाठी संघटित व्हा !

‘हिंदु राष्ट्र’ ही संकल्पना म्हणजे राजकारण नाही, तर राष्ट्रनिष्ठ आणि धर्माधिष्ठित जीवन जगण्याची ती एक प्रगल्भ संस्कृती अन् राज्यव्यवस्था असेल.

‘दक्षिण कैलास’ म्हटले जाणारे श्रीलंकेतील तिरुकोनेश्‍वरम् मंदिर !

‘कोनेश्वरम् मंदिर’ हे ‘तिरुकोनेश्वरम्’ नावाच्या गावात असल्याने या मंदिराला ‘तिरुकोनेश्वरम् मंदिर’ असेही म्हणतात.

रामायणकाळाचा इतिहास लाभलेले आणि सध्या बौद्धांच्या प्रभावाखाली असलेले कदरगामा (श्रीलंका) येथील कार्तिकेय स्वामींचे जागृत मंदिर !

त्रेतायुगात श्रीराम-रावण युद्ध जेव्हा शेवटच्या टप्प्यात येते, तेव्हा इंद्रदेव कार्तिकेयांना आवाहन करतो, ‘‘आता युद्ध अंतिम टप्प्यात आलेले आहे. प्रभु श्रीरामाला युद्ध पूर्ण करण्यासाठी तुमचे साहाय्य लागणार आहे. श्रीराम दुर्गादेवीची पूजा करील, तोपर्यंत तुम्ही सेनेचे अधिपत्य करा.’’

गोमूत्रामुळे कर्करोग बरा होऊ शकतो ! – गुजरातमधील संशोधकांचा दावा

गोमूत्रामुळे तोंड, यकृत, मूत्रपिंड, त्वचा आणि स्तन यांना झालेला कर्करोग बरा होऊ शकतो, असा दावा येथील जुनागड कृषी विद्यापिठाच्या संशोधकांनी केला आहे.

सीतामातेच्या वास्तव्याने पावन झालेले श्रीलंकेतील ‘सीता कोटुवा’ हे स्थान !

रामायणात ज्या भूभागाला ‘लंका’ किंवा ‘लंकापुरी’ म्हटले आहे, ते स्थान म्हणजे आताचा श्रीलंका देश आहे. त्रेतायुगात श्रीमहाविष्णूने श्रीरामावतार धारण केला आणि लंकापुरीला जाऊन रावणादी असुरांचा नाश केला. आता तेथील ७० टक्के लोक बौद्ध आहेत.

श्रीलंकेतील एल्ला शहरातील ‘रावण धबधबा’ आणि ‘रावण गुहा’ !

एल्ला या शहरापासून २ कि.मी. अंतरावर ‘रावणा फॉल्स’ नावाचा एक धबधबा आहे. त्याला येथील लोक ‘रावणा फॉल्स’ असे म्हणतात.

श्रीलंकेतील ‘नुवारा एलिया’ या शहरातील राम-रावण युद्धाचे साक्षीदार असलेले ‘रामबोडा’ आणि ‘रावणबोडा’ पर्वत अन् एका संतांनी स्थापन केलेला ‘गायत्रीपीठ’ आश्रम !

‘नुवारा एलिया’ या शहराजवळ अशोक वाटिका, रावण गुहा, रावण धबधबा, हनुमंताच्या पावलाची खूण, रावणपुत्र मेघनादाचे तपश्चर्या स्थान, राम-रावण युद्धाशी संबंधित क्षेत्र, अशी अनेक स्थाने आहेत.