श्रीरामजन्मभूमी हिंदूंना परत मिळवण्याच्या यशामध्ये जगद्गुरु रामभद्राचार्य यांचे योगदान

जगद्गुरु रामभद्राचार्य यांचे मूळ नाव गिरिधर मिश्रा असून त्यांचा जन्म १४ जानेवारी १९५० या दिवशी जौनपूर जिल्ह्यातील (उत्तरप्रदेश) सांडीखुर्द गावात झाला.

भगवान शिवाला काशीक्षेत्री वास्तव्य करता यावे, यासाठी कार्य करून काशीक्षेत्रीच विराजमान झालेला श्री धुंडीराज विनायक !

‘काशी (उत्तरप्रदेश) येथे सहस्रो मंदिरे आहेत. त्यात गणेशाची ५६ मंदिरे आहेत. या ५६ गणेशांमध्ये श्री धुंडीराज विनायक विशेष आहे. असे म्हटले जाते की, काशीची परिक्रमा केल्यावर श्री धुंडीराज विनायकाचे दर्शन घ्यावे.

सार्‍या जगाला प्रेरक आणि आकाशाहूनही थोर ठरलेली श्रीरामाची पितृभक्ती !

राजा दशरथाने श्रीरामाला अयोध्येच्या सिंहासनावर राज्याभिषेक करायचे ठरवले, तेव्हा कौसल्या-सुमित्रेसह कैकेयी राणीलाही अत्यंत आनंद झाला होता.

मंदिरांच्या दुःस्थितीची कारणे आणि हिंदूंचे धार्मिक कर्तव्य !

पर्यटक मंदिरात बसून भगवंताचे ध्यान आणि नामस्मरण करण्यापेक्षा ‘सेल्फी’ (स्वतःची छायाचित्रे) काढण्यात मग्न असतात. त्यांना त्या मंदिरातील देव किंवा संत, तसेच त्यांचे कार्य यांविषयी जाणून घेण्यात रस नसतो.

तमिळनाडूतील प्रमुख गणपतींपैकी पहिले स्वयंभू श्री गजानन मंदिर !

‘पिळ्ळैयारपट्टी (‘पिळ्ळैयार’ म्हणजे तमिळ भाषेत श्री गजानन) येथील स्वयंभू गजाननाचे मंदिर हे तमिळनाडूमधील गजाननाच्या प्रमुख तीन मंदिरांपैकी पहिले मंदिर आहे.

कलियुगातील दोष नष्ट करण्यासाठी तपस्या करणार्‍या ऋषिगणांची विघ्ने हरण करणारा इडगुंजी (कर्नाटक) येथील श्री महागणपति !

इडगुंजी मंदिरातील मुख्य मूर्तीही चौथ्या किंवा पाचव्या शतकातील आहे. ही द्विभुजा श्री गणेशमूर्ती पाषाणावर उभी आहे. श्री गणेशाच्या उजव्या हातात कमळ आहे आणि दुसर्‍या हातात मोदक आहे.

कुंभासुराचा वध करण्यासाठी भीमाला तलवार दिलेला कर्नाटक राज्यातील कुंभाशी (जिल्हा उडुपी) येथील श्री महागणपति !

कर्नाटक राज्यात उडुपी जिल्ह्यात कुंभाशी येथे श्री आनेगुड्डे महागणपति मंदिर आहे. येथील श्री महागणपतीची मूर्ती अखंड पाषाणातून बनवलेली १२ फूट उंचीची आहे.

श्री विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन होणारे संत गोरा कुंभार

तेरेडोकी गावात संत गोरा कुंभार नावाचे एक विठ्ठलभक्त होते. ते कुंभारकाम करत असतांनादेखील पांडुरंगाच्या भजनात सदैव तल्लीन आणि त्याच्या नामस्मरणात नेहमी मग्न असत.

आपत्कालीन स्थितीमुळे घराबाहेर पडण्यास मर्यादा येत असतांना श्रावण सोमवारी करावयाचे शिवपूजन !

शास्त्रकारांनी मनावर संयम ठेवून, शुचिर्भूतपणादी नियम पाळण्याविषयी, तसेच उपवास करण्याविषयी सांगितले आहे. त्याचप्रमाणे आपापल्या ज्ञानाच्या आधारे शक्य असेल, त्या वैदिक अथवा लौकिक मंत्रांद्वारे शिवाची पूजा करायला सांगितली आहे.

अयोध्येमध्ये श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी घेतले प्रभु श्रीरामाची कुलदेवी श्री देवकालीमातेचे आशीर्वाद !

श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी २ ऑगस्ट या दिवशी श्रीरामाची कुलदेवी श्री देवकालीदेवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले, तसेच ३ ऑगस्टला बालकरूपातील श्रीरामाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले.