बीरभूम (बंगाल) येथील महास्मशानात विराजमान असलेली श्री तारादेवी !
५१ शक्तिपिठांपैकी ५ शक्तिपिठे बंगालच्या बीरभूम जिल्ह्यामध्ये आहेत. बकुरेश्वर, नालहाटी, बंदीकेश्वरी, फुलोरादेवी आणि तारापीठ ही ती शक्तिपिठे होत. द्वारका नदीच्या काठावरील महास्मशानामध्ये पांढर्या शिमूल वृक्षाखाली सतीच्या तिसर्या नेत्रातील बाहुलीतील तारा पडला; म्हणून याला ‘तारापीठ’ म्हटले जाते.