श्री दुर्गादेवीची मूर्ती सिद्ध करतांना मूर्तीकाराने पाळावयाचे आचारधर्म, करावयाची साधना अन् त्यामागील शास्त्र
मूर्तीचा रंग, आकार, उंची आणि त्या मूर्तीत देवत्व आणणे ही दैवी कला आहे. मूर्तीकाराला आचारधर्माचे पालन आणि साधना केल्यामुळे ही कला आत्मसात होते; परंतु मूर्तीकाराला याचे ज्ञान नसल्याने आणि मूर्ती सिद्ध करण्यामागे केवळ व्यावसायिक दृष्टीकोन असल्यामुळे मूर्तीत देवत्व अल्प प्रमाणात येते.