जगद्गुरु भगवान श्रीकृष्णाची विविध गुणवैशिष्ट्ये !
भगवान श्रीकृष्ण प्रत्येकाच्या इंद्रियकर्मांचा परम निर्देशक (मार्गदर्शक) आहे. त्यामुळे त्याला ‘हृषिकेश’ असे संबोधले जाते. ‘हृषीक’ म्हणजे इंद्रिये. त्यांचा ईश, तो हृषिकेश.
भगवान श्रीकृष्ण प्रत्येकाच्या इंद्रियकर्मांचा परम निर्देशक (मार्गदर्शक) आहे. त्यामुळे त्याला ‘हृषिकेश’ असे संबोधले जाते. ‘हृषीक’ म्हणजे इंद्रिये. त्यांचा ईश, तो हृषिकेश.
‘श्रीकृष्णाचे पालक पिता नंद हे ‘आभीर’ जातीचे होते. त्यांना आज ‘अहीर’ या नावाने ओळखले जाते. श्रीकृष्णाच्या जन्मदात्या पित्याचे नाव वसुदेव होते.
श्रीकृष्णासम सखा, गुरु, माय-बाप कोणी नाही, हे जो जाणतो, तो खरा भक्त ! भगवान श्रीकृष्णाला अनन्यपणे शरण जाणारा भक्त संसारसागरातून मुक्त होतो. श्रीकृष्णाप्रती भाव वाढवण्यासाठी त्याच्या दिव्य जीवनाशी निगडित दैवी क्षेत्रांची छायाचित्रे येथे दिली आहेत.
श्रीकृष्ण या देवतेची काही वैशिष्ट्ये आणि तिच्या उपासनेच्या संदर्भातील उपयुक्त अध्यात्मशास्त्रीय माहितीचा या लेखामध्ये समावेश करण्यात आला आहे.