हिंदु धर्मप्रसारासाठी जीवनभर क्षणन्क्षण वेचणारे नगर (महाराष्ट्र) येथील महायोगी गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी !

गुरुदेव डॉ. नारायणानंदनाथ काटेस्वामीजी हे उत्तरप्रदेशातील महान संत धर्मसम्राट करपात्री स्वामीजी यांचे शिष्य ! गुरुदेवांनी पुणे विद्यापिठातून ‘डॉक्टरेट’ची पदवी घेतली होती. त्यांनी जीवनातील बहुतांश काळ हा हिमालयात व्यतीत केला

संत तुकाराम महाराज : प्रेमातील व्यापकता

‘एक राजा त्यागासाठी प्रसिद्ध होता. एकदा त्याची परीक्षा घेण्यासाठी एक ऋषी त्याच्याकडे गेले. ऋषी म्हणाले, ‘‘राजा, तुझे शरीर उभे चिरून त्यातील उभा भाग मला दे; परंतु तू खरा त्यागी असशील, तर तुझ्या डोळ्यांत दुःखाश्रू येता कामा नयेत.’’

मानवजन्माचे सार्थक करण्याचा उपदेश करणारे संत नामदेव यांचे अभंग

श्रीविठ्ठलाची अनन्यसाधारण भक्ती करणारे भक्तशिरोमणि संत नामदेव महाराज ! त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने पंढरपूर येथील त्यांच्या वाड्यांतील विठ्ठलाच्या मूर्तींचे भावपूर्ण दर्शन घेऊया.

संत जनाबाई यांची श्रेष्ठ ईश्‍वरभक्ती दर्शवणारे नि भावविभोर करणारे अभंग !

संत जनाबाई स्वत:ला ‘नामयाची दासी’ म्हणवून घेत असत. विठ्ठलचरणी सर्व जीवन समर्पित केलेल्या जनाबाई यांनी देहभान विसरून दिवसरात्र एक करून संत नामदेवांच्या घरी सेवा केली.

गोस्वामी तुलसीदास यांच्या स्पर्शाने पावन झालेल्या वस्तू !

गोस्वामी तुलसीदास (जन्म : वर्ष १५११, देहत्याग : वर्ष १६२३) हे उत्तरप्रदेशातील महान संत होऊन गेले. त्यांना महर्षि वाल्मिकी ऋषि यांचा अवतार मानले जाते. ते रामचरितमानस, अयोध्याकांड, सुंदरकांड इत्यादी महान आध्यात्मिक ग्रंथांचे रचयिते आहेत.

प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्रात्मक स्मृती (भाग २) !

सनातनचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे प.पू. भक्तराज महाराज हे गुरु होत. त्यांच्याच कृपाशीर्वादाने सनातनची स्थापना झाली. सनातनला प.पू. बाबांचे उत्तराधिकारी प.पू. रामानंद महाराज यांचेही कृपाछत्र लाभले. त्यांच्या आशीर्वादाने वर्ष १९९१ मध्ये स्थापन झालेल्या सनातनच्या कार्याचा आज वटवृक्ष झाला आहे. सनातन परिवार प.पू. बाबांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञ आहे !

समर्थ रामदासस्वामी यांचे आज्ञापालन करतांना जिवाचीही तमा न बाळगणारा त्यांचा शिष्य कल्याण !

गुरूंचे आज्ञापालन केल्याने अनेक शिष्यांची प्रगती झाली, त्यांतीलच एक होते कल्याणस्वामी ! त्यांचे मूळचे नाव अंबाजी. एकदा समर्थ रामदास स्वामींनी अंबाजीला एका विहिरीवर आलेली झाडाची फांदी तोडण्यास सांगितले.

स्वामी विवेकानंद यांच्यासारखा जाज्ज्वल्य धर्माभिमान स्वत:मध्ये बाणवा !

स्वामीजी त्यांच्या शिष्यांसह काश्मीरला गेले होते. तेथे क्षीर भवानीच्या मंदिराचे भग्न अवशेष त्यांनी पाहिले. अत्यंत विषण्ण होऊन स्वामीजींनी स्वत:च्या मनाला विचारले, जेव्हा हे मंदिर भ्रष्ट आणि भग्न केले जात होते, तेव्हा लोकांनी प्राणपणाने प्रतिकार कसा केला नाही ?

‘संगीत आणि नृत्य या कलांच्या माध्यमातून ईश्‍वरप्राप्ती’ करण्यासाठी उडुपी (कर्नाटक) येथील स्वामी विनायकानंदजी महाराज यांनी केलेले मार्गदर्शन !

‘स्वामी विनायकानंदजी महाराज यांनी लहान वयातच साधना करण्याचा निश्‍चय केला. ते लहानपणी बेंगळुरु येथील श्रीरामकृष्ण मठात साधनारत होते.

प.प. वासुदेवानंद सरस्वती (टेंब्येस्वामी) यांच्या गरुडेश्‍वर (जिल्हा नर्मदा, गुजरात) येथील समाधी मंदिराचे छायाचित्रात्मक दर्शन

प.प. श्री. टेंब्येस्वामी महाराज हे संन्यासधर्माचे आदर्श आचार्य होत ! प्रत्यक्ष भगवान श्रीदत्तात्रेयप्रभुच त्यांच्या रूपाने अवतरले आणि त्यांनी श्रीदत्त संप्रदायाची संपूर्ण घडी नीट बसवली. नृसिंहवाडी, औदुंबर, गाणगापूर या दत्तस्थानांवर आचारसंहिता घालून दिली आणि चालू असलेल्या उपासनेला योग्य दिशा अन् अधिष्ठान प्राप्त करून दिले.