गुर्वाज्ञापालनाने गुरुकृपा संपादन करणारे ब्रह्मचैतन्य प.पू. गोंदवलेकर महाराज !

गणुबुवा देहाभिमानशून्य झाल्याची तुकामाईंची निश्‍चिती झाली. त्यांनी गणपतबुवांच्या मस्तकी हात ठेवला आणि त्यांचे ब्रह्मचैतन्य, असे नाव ठेवले. हे गणुबुवा म्हणजेच प.पू. गोंदवलेकर महाराज

सॅन्टोस यांना शांततेचे नोबेल पारितोषिक मिळण्यामागे श्री श्री रविशंकर यांची प्रेरणा !

कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष जूआन सॅन्टोस श्री श्री रविशंकर यांच्याविषयी गौरवोद्गार काढतांना म्हणाले, या शांतता करारासाठी आपण जे कष्ट घेतले त्याविषयी आम्ही तुमचे अत्यंत आभारी आहोत. या घटनेला तुमचे समर्थन आणि मैत्रीच कारणीभूत आहे.

प.पू. पांडे महाराज यांनी मृत्यू या विषयावर केलेले मार्गदर्शन

एखाद्याचा मृत्यू झाल्यावर आपण म्हणतो, मृत्यू झाला, म्हणजेच आता ती व्यक्ती नाही. वास्तविक तिचे अस्तित्व तिथे नसले, तरी तिचे स्थित्यंतर होऊन ती वेगळ्या स्वरूपात असतेच. ती आहे, या भावनेने त्याकडे पाहिल्यास, म्हणजे सकारात्मक भाव ठेवल्यास ती नसल्याचा भाव निर्माण होत नाही.

स्वामी वरदानंद भारती यांचे विचारधन !

श्रावण कृष्ण पक्ष त्रयोदशीला असणार्‍या स्वामी वरदानंद भारती पुण्यतिथीच्या निमित्ताने साप्ताहिक पंढरी प्रहारच्या स्वामी वरदानंद भारती विशेषांकातील (संपादक : भागवताचार्य श्री. वा.ना. उत्पात, एप्रिल १९९१) आणि हिंदु धर्म समजून घ्या ! या पुण्याच्या स्वस्तिश्री प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकातील विविध विषयांवरील निवडक विचार येथे देत आहोत..

प.पू. स्वामी स्वरूपानंद यांच्याशी निगडित अमूल्य ठेवा असलेले कोल्हापूर येथील स्वामी स्वरूपानंद मठ (श्री.जामसंडेकर निवास)

रत्नागिरी जिल्ह्यातील पावस येथील थोर संत प.पू. स्वामी स्वरूपानंद यांचे आध्यात्मिक कार्य अलौकिक आहे. या आध्यात्मिक ठेव्याचा लाभ अनेक भाविकांना आजही होत आहे. कोल्हापूर येथील श्री. जामसंडेकर निवास येथे प.पू. स्वामी स्वरूपानंद यांचा मठ आहे.

प.पू. डॉक्टरांचे आरोग्य सुधारावे आणि हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, यांसाठी अविश्रांतपणे धडपडणारे अश्‍वमेधयाजी प.पू. नाना काळेगुरुजी

दुसरा अश्‍वमेध करणे, म्हणजे शिवधनुष्य उचलल्यासारखेच आहे; कारण हा यज्ञ जवळजवळ दीड वर्ष चालतो आणि प्रतिदिन ८ घंट्यांचे (तासांचे) कर्म करावे लागते. खरंच, संतच हिंदु राष्ट्र येण्यासाठी एवढे कष्ट घेऊ शकतात. संकटातून संतच आपल्याला वाचवू शकतात. हेच प.पू. नानांच्या उदाहरणातून लक्षात येते.

निस्सीम सेवेने भगवान दत्तात्रयांचे दर्शन झालेले संत एकनाथ महाराज !

गुरुकृपेने भगवंताची भेट होते, हे समजल्यानंतर वयाच्या १२ व्या वर्षी (आकाशवाणीच्या निर्देशानुसार) नाथ देवगिरी (दौलताबाद) येथे पोचले. तेथे दत्तभक्त जनार्दनस्वामी किल्लेदार म्हणून होते. नाथांनी त्यांना पाहिले आणि त्यांना सद्गुरु मानून त्यांची मनोभावे सेवा केली.

सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज

सनातन संस्था कशी स्थापन झाली ?… वर्ष १९९१ मध्ये एकदा डॉ. सौ. कुंदाताईंचा मला फोन आला, ‘बाबा (प.पू. भक्तराज महाराज) नाशिकला आले आहेत.

प्रश्‍नावली : संत वाङ्मयातील एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार !

संत त्यांच्या लिखाणातून साधना, अध्यात्म आदी विषयांच्या संदर्भात मार्गदर्शन करत असतात. संतांनी लिहिलेले विविध प्रकारचे गद्य आणि पद्य वाङ्मय सर्वपरिचित आहे.

भावशक्तीच्या जोरावर विदेशात धर्मजागृतीचे महान कार्य प्रभावीपणे आणि यशस्वीरित्या पार पाडू शकणारे स्वामी विवेकानंद !

स्वामी विवेकानंद हे धर्मप्रसारासाठी, म्हणजेच सनातन हिंदु धर्माचे तेज विदेशात पसरवण्यासाठी सवर्र् धर्म परिषदेच्या निमित्ताने भारताचे प्रतिनिधी म्हणून शिकागो (अमेरिका) येथे गेले होते.