दानशूर आणि क्षात्रतेजसंपन्न हिंदु प्रशासक : पुण्यश्लोक अहल्याबाई होळकर
मल्हारराव हे इंदूरच्या होळकरांच्या सत्तेचे संस्थापक. मल्हाररावांच्या निधनानंतर त्यांची सून अहल्याबाई होळकर यांच्या हाती इंदूरच्या राज्यकारभाराची सूत्रे आली. अहल्याबाईंनी सुमारे २८ वर्षे राज्याचा कारभार समर्थपणे करून उत्तरेत मराठी सत्तेची प्रतिमा उंचावली.