गुरु ग्रह अस्तंगत (मावळत) असतांना कोणती कार्ये करावीत ?
‘या वर्षी २३.२.२०२२ पासून २०.३.२०२२ पर्यंत गुरु ग्रहाचा अस्त आहे. प्रत्येक वर्षी सूर्याच्या सान्निध्यामुळे मंगळ, बुध, गुरु, शुक्र आणि शनि हे ग्रह अस्तंगत होत असतात (मावळतात). त्यामध्ये धर्मशास्त्राने आणि मुहूर्त शास्त्रकारांनी गुरु अन् शुक्र यांच्या अस्तंगत कालावधीस विशेष महत्त्व दिले आहे.