कंबोडिया येथे कुणीही ओळखीचे नसतांना ईश्‍वराच्या कृपेने प्रवासातच एका व्यक्तीने साहाय्यासाठी येणे, ही भगवंताच्या अस्तित्वाची अनुभूती !

बाली (इंडोनेशिया) येथून आम्ही सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यासह कंबोडियाला जात होतो. त्या वेळी प्रवासात क्वालालंपूर येथे काही घंटे थांबावे लागले. तेथून कंबोडियाची राजधानी नोम फेन येथे जायचे होते.

विदेशी व्यक्तींचा स्पर्श झाल्यानंतर सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना जाणवलेला सात्त्विक स्पर्श अन् असात्त्विक स्पर्श यांतील भेद !

भारतीय पद्धतीने साडी नेसलेल्या आणि स्वतः दैवी आकर्षणाने ओतप्रोत असलेल्या महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ यांना पाहून अनेक विदेशी पर्यटक त्यांच्याकडे आकर्षित होतात.

सप्तलोकांच्या संकल्पनेवर आधारलेले आणि प्रगत स्थापत्यशास्त्राचा नमुना असलेले इंडोनेशियातील प्रंबनन् म्हणजेच परब्रह्म मंदिर !

मंदिराचा परिसर पुष्कळ मोठा आहे, तसेच सर्व मंदिरांचा कळस पुष्कळ उंच आहे. विशेष म्हणजे मंदिरांच्या बांधकामात कुठेही सिमेंटचा वापर झालेला दिसत नाही. सगळीकडे ‘इंटरलॉकिंग’ पद्धत आहे. दगड एकमेकांमध्ये विशिष्ट प्रकारे अडकवले आहेत. अशा रचनेमुळे मंदिर सात्त्विक दिसते.

भारतियांचे अत्यंत प्रगत प्राचीन जलव्यवस्थापन आणि पाश्‍चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे निर्माण झालेले पाण्याचे दुर्भिक्ष्य !

जगातील पहिले ज्ञात आणि सध्याही वापरात असलेले धरण भारतात आहे, हे आपल्यापैकी किती जणांना माहिती असेल ? इसवी सन दुस-या शतकात चोल राजा करिकलन यांनी बांधलेला ‘अनईकट्टू’ अथवा इंग्रजी भाषेत ‘ग्रँड अनिकट’ (Grand Anicut) किंवा आजच्या बोली भाषेत ‘कल्लानाई बांध’ हा असून तो गेली १८०० वर्षे वापरात आहे.

बाली येथील जागृत ज्वालामुखी असलेला अगुंग पर्वत आणि समुद्रमंथनात दोरीचे कार्य केलेल्या वासुकी नागाचे बेसाखी मंदिर यांची वैशिष्ट्ये !

‘अगुंग पर्वत’ म्हणजे धगधगता आणि अखंड जागृत ज्वालामुखी आहे. येथे प्रत्येक ५-१० मिनिटांनी राखेचा विस्फोट होत असतो. ३ सहस्र १०५ मीटर उंच पर्वत असलेला हा ज्वालामुखी गेले वर्षभर जागृत आहे. त्यामुळे अनेक वेळा बाली द्वीपावर आपत्कालीन स्थिती निर्माण झाली आहे. बाली येथील हिंदू या पर्वताला पवित्र मानतात.

इंडोनेशियातील रहदारीच्या चौकांत रामायण आणि महाभारत काळातील पौराणिक कलाकृती, तसेच लोककलांमध्येही हिंदु पौराणिक कथांचा समावेश !

जकार्ता हे शहर मुसलमानबहुल आहे, तरीही तेथील राष्ट्रीय स्मारकाच्या समोरील चौकात श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाची मोठी कलाकृती पहायला मिळते.

इंडोनेशिया येथील अभ्यास दौर्‍याचा वृत्तांत

इंडोनेशिया देशातील बाली बेटात हिंदू बहुसंख्येने रहतात. तेथे हिंदूंचे सर्व सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात; मात्र हे सण साजरे करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. गुढीपाडव्याचा सण नववर्षारंभ म्हणून ‘न्येपी’ या नावाने साजरा केला जातो.

युरोपमधील अत्याधुनिक वैज्ञानिक संशोधन संस्थेसमोरील नटराजाच्या मूर्तीमुळे उलगडलेले अणूरेणूंचे तांडव !

सर्न येथील प्रयोगशाळेत ‘देवकणां’चे (गॉड्स पार्टिकल) अस्तित्व सिद्ध झाले आहे. या देवकणांच्या अस्तित्वामधूनच निर्मिती, स्थिती आणि लय यांचा स्रोत एकच आहे, असे संकेत मिळत आहेत. हेच सूत्र मोठ्या कलात्मक रितीने या नटराजाच्या मूर्तीतून प्रकट होते.

प्राचीन भारतीय ज्ञानपिठे

प्राचीन भारत हा शिक्षण क्षेत्रात अग्रेसर होता. भारतीय शिक्षणपद्धत जगमान्य होती. आजसारखी तरुण पिढी तेव्हा उच्च शिक्षण घेण्यास विदेशात तर जात नव्हतीच, उलट विदेशातून असंख्य जिज्ञासू ज्ञानार्जन करण्यासाठी भारतीय विद्यापिठांत येत.