कंबोडियातील ‘अंकोर थाम’ परिसरात बौद्ध आणि हिंदु धर्म यांचे प्रतीक म्हणून बांधलेले ‘बॅयान मंदिर’ !
‘बॅयान’ म्हणजे ‘बोधी’. बुद्धाला बोधी वृक्षाच्या खाली ४९ व्या दिवशी ज्ञानोदय झाला. त्यामुळे या मंदिरात बुद्धाचे एकूण ४९ चेहरे आहेत.
‘बॅयान’ म्हणजे ‘बोधी’. बुद्धाला बोधी वृक्षाच्या खाली ४९ व्या दिवशी ज्ञानोदय झाला. त्यामुळे या मंदिरात बुद्धाचे एकूण ४९ चेहरे आहेत.
विष्णुकुमार आणि यज्ञवराह यांनी ईश्वरपूरच्या मध्यभागी भगवान शिव अन् श्री पार्वती देवी यांचे एक मंदिर बांधले आणि त्या मंदिराला ‘त्रिभुवन महेश्वर’, असे नाव दिले
१२ व्या शतकाच्या शेवटी जयवर्मन राजाने (सातव्या) आईसाठी बांधलेले ता-फ्रोम् मंदिर !
मंदिराच्या बाहेरच्या प्रांगणात असलेल्या भिंतींवर अनेक शिल्पे आहेत. त्यांत मुख्य प्रवेशद्वाराच्या डावीकडे आणि उजवीकडे युद्धाची दृश्ये कोरलेली आहेत. यामध्ये खमेर सैनिक (कंबोडिया) आणि चंपा सैनिक (व्हिएतनाम) यांच्यात झालेल्या युद्धाची दृश्ये, खमेर सैनिकांच्या साहाय्याला आलेले चिनी सैनिक, अशा अनेक दृश्यांचा समावेश आहे.
कंभोज देशाच्या उत्तरेला महेंद्र पर्वत आणि उत्तरेहून दक्षिणेकडे वहाणारी मेकांग नदी आहे, तसेच दक्षिणेला समुद्र आहे. विशाल कंभोज देशाची राजधानी महेंद्र पर्वतावर होती.
अंकोर थाम परिसरातील बॅयान मंदिरापासून थोड्या अंतरावर गेल्यावर आपल्याला पिरॅमिडच्या आकारात असलेले, तसेच आता भग्न झालेले एक मोठे मंदिर दिसते. यालाच बापून मंदिर, असे म्हटले जाते.
‘अंकोर वाट’ मंदिराच्या पश्चिम द्वाराकडील मुख्य प्रवेशद्वाराला असलेल्या ३ गोपुरांपैकी उजव्या बाजूच्या गोपुरामध्ये आजही श्रीविष्णूची विशाल अष्टभुजा मूर्ती आहे.
हिंदूंचे जगातील सर्वांत मोठे मंदिर हिंदुबहुल भारतात नसून ते कंबोडियात आहे. त्या मंदिराचे नाव आहे अंकोर वाट !’
राजवाड्याचे वैशिष्ट्य असे आहे की, हा राजवाडा चीन आणि फ्रेंच वास्तूशैलीनुसार बांधला आहे; पण राजवाड्यातील सर्व चिन्हे ‘सनातन हिंदु धर्मा’शी संबंधित आहेत. राजवाड्याच्या परिसरात प्रवेश करतांना श्रीविष्णु आणि शिव एकत्र असलेल्या ‘हरिहर’ मूर्ती दिसतात.
महाभारतात ज्या भूभागाला ‘कंभोज देश’, असे संबोधले आहे, तो म्हणजे आताचा कंबोडिया देश ! येथे १५ व्या शतकापर्यंत हिंदू रहायचे. ‘खमेर नावाचे हिंदु साम्राज्य येथे वर्ष ८०२ ते १४२१ पर्यंत होते’, असे म्हटले जाते.