गुरूंच्या आज्ञेचे पालन करून त्यांचे मन जिंकणारा उपमन्यू !
धौम्यऋषींचा शिष्य उपमन्यू हा गुरुगृही राहून आश्रमातील गायी सांभाळण्याची सेवा करत असे. तो भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करी. त्याची परीक्षा पहाण्यासाठी एकदा धौम्यऋषींनी मिळालेल्या भिक्षेतील अर्धी भिक्षा गुरूंना द्यावी आणि उरलेल्या भिक्षेवर निर्वाह करावा, असे त्याला सांगितले.