बाटीक नक्षीचे कपडे आणि त्या नक्षीची परंपरा टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करणारे इंडोनेशियातील राज्यकर्ते अन् नागरिक !
‘भारतात जसे खादीचे कापड प्रसिद्ध आहे, तसे इंडोनेशियात ‘सुती बाटीक’ प्रकारची कलाकुसर असलेले राष्ट्रीय कापड प्रसिद्ध आहे. बाटीक हा ‘जावानीस’ भाषेतील शब्द आहे. त्याचा अर्थ ‘लिहिणे किंवा बिंदू किंवा नक्षी काढणे’, असा आहे.