गुरु-शिष्य नात्यातील वीण घट्ट करणारा कृतज्ञताभाव !
माझ्यातील कर्तेपणा, अपेक्षा करणे, स्वतःला श्रेष्ठ समजणे इत्यादी अहंच्या पैलूंमुळे माझा देवाण-घेवाण हिशोब वाढत रहायचा. त्यामुळे मी भवसागरातील सुख-दुःखाच्या लाटांमध्ये गटांगळ्या खात होतो. माझी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्याशी भेट झाल्यावर हे गणित हळूहळू सुटू लागले. त्यांच्यामुळे मला ठाऊक नसलेल्या ‘कृतज्ञता’या शब्दातील भाव हळूहळू उलगडत गेले.