गणेश पूजन आणि उपासना यांसाठी ‘चतुर्थी’ या तिथीचे महत्त्व अन् गणेशाच्या निरनिराळ्या अवतारांतील त्याची नावे आणि कार्य
‘चतुर्थी’ या तिथीची देवता ‘श्री गणेश’ आहे; कारण तो विघ्न दूर करणारा आहे. आपल्या संस्कृतीत श्री गणेश आणि सरस्वती या दोन्ही देवतांचे ‘बुद्धीदायी देवता’ असे वर्णन केले आहे;