कोकणची काशी : श्री देव कुणकेश्वर
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील श्रीक्षेत्र कुणकेश्वराला कोकणची काशी असे संबोधतात. कुणकेश्वर येथे १०७ शिवलिंगे आहेत. कोकणातील इतर प्रसिद्ध अशा भगवान शंकरांच्या स्थानांत याची गणना होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील श्रीक्षेत्र कुणकेश्वराला कोकणची काशी असे संबोधतात. कुणकेश्वर येथे १०७ शिवलिंगे आहेत. कोकणातील इतर प्रसिद्ध अशा भगवान शंकरांच्या स्थानांत याची गणना होते.
धायरी गावातील धारेश्वराचं मंदिर हे अनुभवण्यासारखेच आहे. गाभा-यातील स्वयंभू प्रसन्न शिवलिंग पहातांना हात नकळत जोडले जातात. चैत्र वद्य चतुर्थीला श्री धारेश्वराची मोठी यात्रा भरते.
‘देव’ म्हणजे नेमके काय, हे जाणून घेण्याची प्रत्येकाची जिज्ञासा असते. प्रस्तुत लेखात आपण ‘देव’ आणि ‘देवी’ या शब्दांचे अर्थ तसेच देवांना अनेक नावे असण्यामागील कारणे पाहू.
ईश्वरनिर्मित हिंदु धर्मात ३३ कोटी देवता आहेत, हे आपण वारंवार ऐकले आणि वाचलेही असते; परंतु त्यामागील कार्यकारणभाव आणि शास्त्र ज्ञात नसल्याने त्याचे महत्त्व आपल्या लक्षात येत नाही. प्रस्तुत लेखात देवतांच्या संख्येविषयी माहिती पाहू.
कर्तव्यपरायण, राजनिष्ठ, स्वामीसेवातत्पर आणि यशस्वी असा हा रामदूत युद्धप्रिय आणि लष्करी बाण्याच्या वीर मराठ्यांना वंदनीय आणि प्रिय वाटतो.
ज्योतिर्लिंगे आणि स्वयंभू शिवलिंगांमध्ये इतर शिवलिंगांच्या तुलनेत निर्गुण तत्त्वाचे प्रमाण अधिक असल्यामुळे त्यांतून अधिक प्रमाणात निर्गुण चैतन्य आणि सात्त्विकता यांचे सतत प्रक्षेपण चालू असते. त्यामुळे पृथ्वीवरील वातावरणाची सतत शुद्धी होत असते.
ज्यामुळे आमची पापे नाश पावतात आणि आम्हाला ईश्वराचे स्मरण होते, ते भस्म ! देवाची पूजा म्हणून यज्ञात आहुती दिलेले तूप, समिधा, इतर वनस्पती इत्यादी सर्व जाळल्यावर जे अवशेष रहातात, त्यालाच ‘भस्म’ म्हणतात.
शिवाच्या पूजेतील बेल हा एक महत्त्वाचा घटक आहे. तो शिवाला वाहिल्याने पूजकाला होणारे मानसशास्त्रीय आणि आध्यात्मिक लाभ, तसेच तो कसा वहावा, यांविषयीचे शास्त्रीय विवेचन या लेखात केले आहे.
अक्ष म्हणजे डोळा. रुद्र ± अक्ष म्हणजे जो सर्व पाहू आणि करू शकतो, तो रुद्राक्ष. डोळा एकाच अक्षाभोवती फिरतो; म्हणून त्यालाही अक्ष म्हणतात.