‘रामसे बडा रामका नाम’ ही म्हण सार्थ ठरवणारा भक्तशिरोमणी हनुमान !
‘जो कुणी प्रभु श्रीरामाचे स्मरण करत असेल, त्याचे संरक्षण हनुमंत करील आणि कुणीही त्या व्यक्तीचे अहित करू शकणार नाही’, असा वर हनुमानाने मागितला.
‘जो कुणी प्रभु श्रीरामाचे स्मरण करत असेल, त्याचे संरक्षण हनुमंत करील आणि कुणीही त्या व्यक्तीचे अहित करू शकणार नाही’, असा वर हनुमानाने मागितला.
आंध्रप्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात असलेले कनिपकम् विनायक मंदिर हे स्वयंभू गणेशमूर्ती आणि अनेक आख्यायिका यांमुळे जगभरात प्रसिद्ध आहे. चोल वंशाच्या राजाने ११व्या शतकात हे मंदिर बांधल्याचे सांगितले जाते. विजयनगरच्या राजाने वर्ष १३३६ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार केला.
धार्मिक मान्यतेनुसार अमरनाथ गुहेतील बर्फाच्या शिवलिंगाचे दर्शन घेतल्याने काशीमध्ये घेतलेल्या दर्शनापेक्षा १० पट, प्रयागपेक्षा १०० पट आणि नैमिषारण्यापेक्षा १ सहस्र पट अधिक पुण्य लाभते. म्हणूनच आजही कोट्यवधी हिंदू मोठ्या भक्तीभावाने अमरनाथ यात्रा करतात.
देवीच्या उपासनेची परंपरा पुष्कळ पूर्वीपासून भारतात चालत आलेली आहे. देवीचे मूळ रूप निर्गुण असले, तरी तिच्या सगुण रूपाची उपासना करण्याची परंपरा भारतात प्रचलित आहे. उपासकांच्या हृदयात देवीला विशेष स्थान असल्यामुळेच प्रतीवर्षी नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहाने भारतभर साजरा केला जातो.
दुर्गा – श्री दुर्गामहायंत्र हे श्री भगवतीदेवीचे (दुर्गेचे) आसन आहे. नवरात्रात दुर्गेच्या नऊ रूपांची उपासना करतात.
प्रत्येक देवता हे एक विशिष्ट तत्त्व आहे. देवतेची उपासना करतांना पूजकाच्या मनात त्या देवतेविषयी सतत भावजागृती होईल, असे तिचे रूप असणे महत्त्वाचे ठरते. देवतेचे द्विमितीय रूप (चित्र) अथवा त्रिमितीय रूप (मूर्ती) जितके…
मूर्तीचा रंग, आकार, उंची आणि त्या मूर्तीत देवत्व आणणे ही दैवी कला आहे. मूर्तीकाराला आचारधर्माचे पालन आणि साधना केल्यामुळे ही कला आत्मसात होते; परंतु मूर्तीकाराला याचे ज्ञान नसल्याने आणि मूर्ती सिद्ध करण्यामागे केवळ व्यावसायिक दृष्टीकोन असल्यामुळे मूर्तीत देवत्व अल्प प्रमाणात येते.
थर्व म्हणजे गरम, अथर्व म्हणजे शांती आणि शीर्ष म्हणजे मस्तक. ज्याच्या पुरश्चरणाने मस्तकास शांती प्राप्त होते ते अथर्वशीर्ष होय. भगवान जैमिनीऋषींचे सामवेदीय शाखेतील शिष्य मुद्गलऋषी यांनी साममुद्गल गणेशसूक्त लिहिले. त्यानंतर त्यांचे शिष्य गणकऋषी यांनी श्री गणपति अथर्वशीर्ष लिहिले.
प्रत्येकाच्या (दानव आणि मानव यांच्या) मनाची शक्ती वेगवेगळी असते. प्राणशक्ती, विचार आणि मन यांचा परस्पर संबंध आहे.
श्रीकृष्णासम सखा, गुरु, माय-बाप कोणी नाही, हे जो जाणतो, तो खरा भक्त ! भगवान श्रीकृष्णाला अनन्यपणे शरण जाणारा भक्त संसारसागरातून मुक्त होतो. श्रीकृष्णाप्रती भाव वाढवण्यासाठी त्याच्या दिव्य जीवनाशी निगडित दैवी क्षेत्रांची छायाचित्रे येथे दिली आहेत.