सनातन संस्थेचे प्रवक्ते चेतन राजहंस यांनी घेतली देहली येथील सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता अलख आलोक श्रीवास्तव यांची सदिच्छा भेट !

सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी हिंदु धर्म आणि राष्ट्र यांच्या हितासाठी कार्य करणारे येथील सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता अलख आलोक श्रीवास्तव यांची नुकतीच सदिच्छा भेट घेतली.

सनातन संस्था मूर्तीशास्त्रविषयक सांगत असलेले ज्ञान अत्यंत उपयुक्त ! – दत्ता जुवेकर, गणेशमूर्तीकार, गोवा

सनातन संस्था मूर्तीशास्त्रविषयक सांगत असलेले ज्ञान अत्यंत उपयुक्त आहे, असे उद्गार बेतुल, केपे येथील श्री गणेशमूर्तीकार श्री. दत्ता जुवेकर यांनी काढले.

सनातनच्या प्रदर्शनस्थळी सुगंध आणि प्रसन्नता जाणवते ! – सौ. मेधा कुलकर्णी, भाजप आमदार, पुणे

कोथरूड येथील डहाणूकर कॉलनीतील राम मंदिराच्या समोर सनातनची सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाला कोथरूडच्या भाजप आमदार सौ. मेधा कुलकर्णी यांनी भेट दिली.

सात्त्विक शक्तीच्या आधारावर धर्मबोध आणि शौर्यबोध जागृत करण्याचे सनातन संस्थेने हाती घेतलेले कार्य पुष्कळ स्तुत्य आहे ! – के.एन्. गोविंदाचार्य, इटर्नल हिंदू फाऊंडेशन

श्री. के.एन्. गोविंदाचार्य हे ‘इटर्नल हिंदू फाऊंडेशन’च्या एका कार्यक्रमानिमित्त पनवेल येथे ११ मार्च या दिवशी आले होते. त्यानिमित्ताने त्यांनी कार्यकर्त्यांसमवेत सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.

राष्ट्र आणि धर्मरक्षणाचे कार्य करणार्‍या सनातनसारख्या संस्थांच्या विचारांचा प्रचार आम्ही सतत करणार ! – राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. संदीपबुवा मांडके, पुणे

देव, देश  आणि धर्म संरक्षणाचे कार्य करणार्‍या संस्थांच्या विचारांचा प्रसार आम्ही सतत करू, असे उद्गार पुणे येथील राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. संदीपबुवा मांडके यांनी हुमरमळा, वालावल येथे कीर्तन कार्यक्रमात काढले.

जळगावातील नागरिकांनी सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचा लाभ घ्यावा ! – महापौर सौ. सीमा भोळे, भाजप

महापौर सौ. सीमा भोळे यांनी सांगितले, ‘‘मी सनातनचे ग्रंथ आणि उत्पादने यांचा लाभ वर्ष १९९८ पासून घेत असून हे कार्य स्पृहणीय आहे.

सनातन संस्था ही सर्व संतांनी सांगितलेले ज्ञान संकलित करते ! – रवींद्र प्रभुदेसाई, पितांबरी व्यवस्थापकीय संचालक

सनातन संस्था ही सर्व संतांनी सांगितलेले ज्ञान संकलित करते, असे प्रतिपादन पितांबरी आस्थापनाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांनी केले.

‘परम पूज्य डॉ. आठवले यांनी कलियुगामध्ये गीतेत सांगितल्याप्रमाणे अवतार घेतला आहे ! ‘ – ह.भ.प. नामदेव महाराज वासकर

‘सनातन धर्माचे कार्य काळानुरूप अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे लवकरच विश्‍वात हिंदु धर्माची स्थापना होईल’, असे ह.भ.प. नामदेव महाराज वासकर यांनी म्हटले.

माझी हिंदुत्वाविषयीची भूमिका आणि सनातन संस्थेचे ध्येयधोरण एकच ! – भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे

हिंदु जनजागृती समितीचे मुंबईचे प्रवक्ता डॉ. उदय धुरी आणि श्री. सतीश सोनार यांनी नुकतीच ज्येष्ठ प्रवचनकार भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे यांची त्यांच्या चेंबूर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन त्यांना प.पू. डॉ. आठवले यांचा छायाचित्रमय जीवनदर्शन ग्रंथ भेट दिला.

एक वेळ विम्याला पर्याय असेल; पण सनातनला नाही ! – विद्याधर नारगोलकर, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठान, पुणे

स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात, गुणसुमने वेचलिया या भावे । की तिने सुगंधा व्हावे । जरी उद्धरणी व्यय तिचा न हो साचा । हा व्यर्थ भार विद्येचा ॥ याप्रमाणे सनातन प्रभातची वाटचाल आहे.