रायपूर (छत्तीसगड) येथील संतश्री पू. डॉ. युधिष्ठिरलालजी महाराज यांची रामनाथी येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट
रायपूर (छत्तीसगड) येथील शदाणी दरबार तीर्थचे नवम् पीठाधीश संतश्री पू. डॉ. युधिष्ठिरलालजी महाराज यांनी येथील सनातनच्या आश्रमाला १६ फेब्रुवारी या दिवशी सदिच्छा भेट दिली. या वेळी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी आश्रमात राष्ट्र-धर्म यांच्याविषयी करण्यात येणार्या विविध सेवा अन् कार्य यांविषयी संतश्री पू. डॉ. युधिष्ठिरलालजी महाराज यांना सविस्तर माहिती सांगितली.