मी आता सनातनचाच झालो आहे ! – वेदमूर्ती श्री. नंदकुमार रहाणे

मी आता सनातनचाच झालो आहे. सनातनचे कार्य पुष्कळ चांगले आहे. अनेक दिवसांपासून आश्रमात यायची इच्छा पूर्ण झाली, असे भावपूर्ण उद्गार पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील फुरसुंगी येथील वेदमूर्ती, ग्रामोपाध्याय श्री. नंदकुमार रहाणे यांनी काढले.

प्रसिद्ध कन्नड चित्रपट निर्माते अधिवक्ता मारुति जडियावर यांची सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !

प्रसिद्ध कन्नड चित्रपट निर्माते अधिवक्ता मारुति जडियावर यांनी सनातन आश्रमाला सदिच्छा भेट दिली. गोवा येथे चालू असलेल्या आंतराराष्ट्रीय चित्रपट मोहत्सवात सहभागी होण्यासाठी ते आले होते.

चतुर्थ अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला उपस्थित असलेल्या मान्यवरांनी सनातनच्या रामनाथी आश्रमाला भेट दिल्यानंतर व्यक्त केलेले अभिप्राय !

मला प्रांजळपणे मान्य करावेसे वाटते की, ही संस्था हिंदु समाजामध्ये जनजागृती करणे, तसेच हिंदु धर्मातील चांगल्या आणि पवित्र गोष्टींची जाणीवपूर्वक जपणूक करतांना दिसते. पावित्र्य आणि शुचिर्भूतता यांचा सुरेख संगमच या भेटीत मला आढळून आला.

चतुर्थ अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला उपस्थित असलेल्या मान्यवरांनी सनातनच्या रामनाथी आश्रमाला भेट दिल्यानंतर व्यक्त केलेले अभिप्राय !

आश्रमातील प्रत्येक क्षणाचा योग्य प्रकारे उपयोग करण्याचा येथे विचार होतो आणि ते आनंदाने आचरणात आणणार्‍या साधकांना पाहून मला पुष्कळ समाधान वाटले.

अमेरिकेतील संशोधक डॉ. श्रीकांत पाटील यांची सनातन आश्रमाला भेट !

अमेरिकेतील ‘त्रिवेदी ग्लोबल इनकॉर्पोरेशन’ (Trivedi Global Inc.,USA) या संस्थेचे संशोधन विभागाचे संचालक (‘डायरेक्टर रिसर्च’) डॉ. श्रीकांत पाटील यांनी सनातन आश्रमाला भेट दिली.

नाशिक येथील अधिवक्ता विजय कुलकर्णी यांची रामनाथी येथील सनातन आश्रमाला भेट

रामनाथी आश्रम पाहून अधिवक्ता श्री. विजय कुलकर्णी भारावले. यासंदर्भात अभिप्राय व्यक्त करतांना ते म्हणाले,…

बेंगळुरू येथील प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शिका सौ. पद्मश्री जोसलकर यांची सनातनच्या गोवा येथील आश्रमाला भेट

बेगळुरू (कर्नाटक) येथील प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शिका सौ. पद्मश्री जोसलकर यांनी सनातन संस्थेच्या गोवा येथील आश्रमाला नुकतीच सदिच्छा भेट दिली.

कोल्हापूर येथील गोभक्त ह.भ.प. हरिदास कुळकर्णी यांची रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट

कोल्हापूर येथील गोभक्त ह.भ.प. हरिदास कुळकर्णी यांनी १० डिसेंबर या दिवशी गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. कै. ह.भ.प. दत्तदास घागबुवा यांचे शिष्य आहेत. ते गोवंश रक्षा आणि गोवंश हत्या या विषयावर कीर्तनाच्या माध्यमातून जागृती करतात.

तृतीय अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला आलेल्या हिंदुत्ववाद्यांची सनातन आश्रमाला भेट !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी रामनाथी, गोवा येथे २० जूनपासून तृतीय अखिल भारतीय हिंदू अधिवेशन चालू झाले आहे.

सनातन संस्था आणि प.पू. डॉक्टरांचे श्रेष्ठत्व अन् महत्त्व

प्रत्यक्ष प्रमाण मानणार्‍या बुद्धीप्रामाण्यवाद्यांना अध्यात्मशास्त्राचे महत्त्व कळावे, तसेच समाजालाही धर्मशिक्षण मिळावे यासाठी सर्वाश्रम वैश्‍विक ऊर्जा संशोधन केंद्र या संस्थेचे श्री. संतोष जोशी अध्यात्मशास्त्रीय संशोधन करण्याचे कार्य करत आहेत.