तृतीय अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला आलेल्या हिंदुत्ववाद्यांची सनातन आश्रमाला भेट !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी रामनाथी, गोवा येथे २० जूनपासून तृतीय अखिल भारतीय हिंदू अधिवेशन चालू झाले आहे.

सनातन संस्था आणि प.पू. डॉक्टरांचे श्रेष्ठत्व अन् महत्त्व

प्रत्यक्ष प्रमाण मानणार्‍या बुद्धीप्रामाण्यवाद्यांना अध्यात्मशास्त्राचे महत्त्व कळावे, तसेच समाजालाही धर्मशिक्षण मिळावे यासाठी सर्वाश्रम वैश्‍विक ऊर्जा संशोधन केंद्र या संस्थेचे श्री. संतोष जोशी अध्यात्मशास्त्रीय संशोधन करण्याचे कार्य करत आहेत.

प.पू. स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांची रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमाला मंगल भेट !

अखिल भारतीय संत समितीचे अध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांनी सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी सनातनचे साधक श्री. चेतन राजहंस यांनी त्यांना आश्रमात चालणारे राष्ट्र, धर्म आणि आध्यात्मिक संशोधन यांच्या कार्याविषयी परिचय करून दिला.

जैनमुनी पू. विनम्रसागरजी महाराज यांची देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमास मंगलभेट !

सनातन संस्थेचे कार्य आणि आश्रमातील सर्व व्यवस्था पाहून जैनमुनी पू. विनम्रसागरजी महाराज अतिशय प्रभावित होऊन म्हणाले, कोणाला एम्बीएचा कोर्स करायचा असेल, तर त्याने महाविद्यालय सोडून येथे यायला हवे.

श्री शिवबोधाश्रम (श्री रमेशाश्रम)जीयांची सनातन आश्रमाला सदिच्छा भेट

जालंधर (पंजाब) येथील श्री अनंत श्री विभूषित श्री दण्डी स्वामी श्री शिवबोधाश्रम(श्री रमेशाश्रम)जी महाराज यांनी रामनाथी येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट दिली.

सनातन (रामनाथी) आश्रमाला भेट देणारेदोन विदेशी वैज्ञानिक कार्य पाहून प्रभावित !

रामनाथी, येथील सनातनच्या आश्रमाला २ विदेशी वैज्ञानिकांनी भेट दिली. आश्रमात ठिकठिकाणी घडणार्‍या घडामोडींचे आध्यात्मिक दृष्टीकोनातून संशोधन करून त्याचे जतन केलेले पाहून ते प्रभावित झाले आणि त्यांनी त्याची प्रशंसाही केली.

ह.भ.प. भगवान विठ्ठल कोकरे महाराज यांची रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !

ह.भ.प. कोकरे महाराज यांनी आश्रमभेटीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करतांना सांगितले की, सनातनचे कार्य संपूर्ण जगातील हिंदूंना प्रेरणादायी आहे. हा आश्रम नसून पृथ्वीवर भगवंताने धर्मराज्यासाठी उघडलेला धर्मदरबार आहे.

सनातन संस्थेचे अमर्याद कार्य म्हणजे शाश्वताचे वैभव ! – प.पू. स्वामी गणेशानंद परमहंस

सनातन संस्थेचे कार्य म्हणजे शाश्वताचे वैभव आहे. या कार्याला कोणीही बंधने घालू शकत नाही, असे गौरवोद्गार कोल्हापूर जिल्ह्यातील शिवशक्ती सिद्धपीठ सह्याद्री पहाड ट्रस्ट-मुक्तानंद तीर्थस्थळ आश्रमाचे प.पू. स्वामी गणेशानंद परमहंस यांनी काढले.

योगऋषी रामदेवबाबा यांचे रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाला चरणस्पर्श !

भागवद् धर्माला मूर्त रूप देण्याचे कार्य सनातन करत आहे ! सनातन संस्था फार मोठे कार्य करत आहे ! – योगऋषी रामदेवबाबा

सनातनचा रामनाथी (गोवा) येथील आश्रम पहायला मिळणे, हे हिंदूंसाठी मोठे भाग्यच !

२९.१२.२०१३ या दिवशी मी माझ्या कुटुंबासह सनातन आश्रमामध्ये प्रवेश केला. तेथील आदरातिथ्य आणि नम्रता पाहून अन् अनुभवून आमचा प्रवासातील शीण त्वरित गेला.