सनातनचे ग्रंथप्रदर्शन पाहून मला येथून जावेसे वाटत नाही ! – महंत श्री देवनारायणदास वेदांताचार्य महाराज, कानपूर, उत्तरप्रदेश

महंत देवनारायणदास वेदांताचार्य महाराज आणि त्यांच्यासमवेत आलेले महंत श्री वैष्णुदास बिथान (बिहार) यांनी सनातनच्या ग्रंथप्रदर्शनास भेट दिली.

सनातनच्या कार्याला माझेही सहकार्य असेल ! – श्री महंत कृष्णदास महाराज, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय श्री पंच दिगंबर अग्नि आखाडा

सनातनचे ग्रंथप्रदर्शन अतिशय चांगले आहे. असे प्रदर्शन लावल्यामुळे अध्यात्मप्रसार होऊन देशात हळूहळू सर्वत्र जागृती होईल.

सनातन संस्थेच्या प्रदर्शनातून भारतीय संस्कृतीची सत्य माहिती मिळत असल्याचे पाहून प्रसन्नता वाटली ! – महामंडलेश्‍वर डॉ. स्वामी प्रेमानंद महाराज

प्रदर्शनात भारतीय संस्कृतीची सत्यतापूर्वक माहिती देत असल्याचे पाहून मला मोठी प्रसन्नता वाटली आहे, असे प्रतिपादन ‘संत नामःभारत साधू समाजा’चे राष्ट्रीय संघटनमंत्री महामंडलेश्वर डॉ. स्वामी प्रेमानंद महाराज यांनी २४ जानेवारी या दिवशी येथे केले.

स्लोव्हेनिया येथील नागरिक ईगर प्रिस्टावेज वर्धा येथे आले असता सनातन संस्थेच्या कार्याने प्रभावित

हिंदु धर्माविषयी आस्था असलेले युरोपातील स्लोव्हेनिया येथील ईगर प्रिस्टावेज हे वर्धा येथे आले असता त्यांना सनातन संस्थेविषयी माहिती देण्यात आली. संस्थेची माहिती ऐकून ते प्रभावित झाले.

संपूर्ण विश्‍वात सनातन संस्थेसारख्या अध्यात्म विश्‍वविद्यालयाची आवश्यकता आहे ! – वृंदावन आचार्य नित्यानंद गिरी महाराज

आचार्य नित्यानंद गिरी महाराज आणि त्यांच्यासमवेत आलेल्या साध्वी हरिप्रियाजी महाराज यांनी २४ जानेवारी या दिवशी सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली.

साधूंपेक्षाही सनातन श्रेष्ठ कार्य करत आहे ! – पू. फरशीवालेबाबा

पू. फरशीवालेबाबा यांनी सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट दिल्यावर सनातनच्या कार्याचे कौतुक केले.

सनातन धर्माला वाचवण्याचे मोठे कार्य सनातनचे साधक करत आहेत ! – स्वामी श्री धर्मदास महाराज

सनातनचे प्रदर्शन पाहून प्रसन्नता मिळाली. हे ग्रंथप्रदर्शन पाहून माझी भावजागृती झाली. सनातन धर्माला वाचवण्याचे मोठे कार्य सनातनचे साधक करत आहेत.

कुंभमेळ्यातील तिसरी गंगा म्हणजे ‘सरस्वती’ सनातनच्या ग्रंथप्रदर्शनातून वहात आहे ! – श्री प्रभु नारायण करपात्री

कुंभमेळ्यातील तिसरी गंगा म्हणजे ‘सरस्वती’ सनातनच्या ग्रंथप्रदर्शनातून वहात आहे, असे आशीर्वचन काशी येथील संत श्री प्रभु नारायण करपात्री यांनी सनातन प्रभातच्या प्रतिनिधीशी बोलतांना दिले.

सनातनचे साधक संतसेवेत असल्याने त्यांच्या चेहर्‍यावर संतसंगतीचा आनंद दिसून येतो ! – श्री श्री १००८ श्री महामंडलेश्‍वर महंत रघुवीरदास महात्यागी महाराज

सनातनच्या सर्व साधकांकडे पाहून पुष्कळ प्रसन्न वाटते. त्याचे कारण म्हणजे ते संतसेवेत असून संतसंगतीचा आनंद त्यांच्या चेह-यावर दिसून येत आहे, असे प्रतिपादन श्री रघुवीर महात्यागी खालसाचे श्री श्री १००८ श्री महामंडलेश्वर महंत रघुवीरदास महात्यागी महाराज यांनी येथे केले.

सनातनचे हिंदु धर्मजागृतीचे महान कार्य पाहून पूर्ण समाधान झाले ! – लक्ष्मण बेहरे, संघचालक, गोवा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोवा संघचालक श्री. लक्ष्मण बेहरे यांनी १८ जानेवारी या दिवशी सनातनच्या येथील आश्रमाला सदिच्छा भेट दिली.